Home Breaking News खडकी बाजार येथील शेतकरी पांदण रस्त्यासाठी आक्रमक

खडकी बाजार येथील शेतकरी पांदण रस्त्यासाठी आक्रमक

भुमिराजा न्यूज प्रतिनिधीरविकुमार पवार खडकीकर मो.7350333415

हिमायतनगर :- हिमायतनगर तालुक्यातील खडकी बाजार येथील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी पादन रस्ता ग्रामपंचायत पूर्वसंमती मिळाली 15 डिसेंबर रोजी हिमायतनगर हदगाव तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते सदरील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन होणार होते. परंतु या रस्त्यावर येणाऱ्या एका शेतकऱ्याने अडवल्यामुळे संबंधित रस्त्याचे भूमिपूजन तूर्तास समोर ढकलण्यात आली आहे. यामुळे या रस्त्यावरील शेतकरी आक्रमक झाल्यामुळे त्यांनी थेट 16 डिसेंबर रोजी महिला सह पुरुषांनी  हिमायतनगर तहसील कार्यालय धडकून येथील तहसील प्रशासनाला पांदण रस्त्याच्या कामाला सुरुवात करा अशी मागणी एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे सदरील निवेदन हे महिलांच्या उपस्थितीमध्ये हिमायतनगर येथील नायक तशिलदार विकास राठोड यांना दिले.
जर या रस्त्याचे काम सात दिवसाच्या आत सुरु न झाल्या महिला सह तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण बसण्याचे निवेदनात नमूद केले आहे.
.   सदरील रस्त्यामुळे रस्ता पूर्ण झाल्यास येथील शेतकऱ्यासह सामान्य नागरिकांनाही दिलासा मिळणार आहे कारण हा त्याच्या अंतरावर असलेल्या सरसम येथे शासकीय कामासाठी रोज याचा करावी लागत असते सरसम येथे स्टेट बँक असल्यामुळे खडकी हे गाव भारतीय स्टेट बँक सरसम श्री सलग्न असल्यामुळे रोज नागरिकांना या रस्त्याने ये जा करावी लागत आहे सदरील रस्ता पूर्ण झाल्यास नागरिकाचा  वेळ व पैसाही बचत होईल त्याचबरोबर सरसम येथील नागरिकांना सुद्धा खडकी येथील रेल्वे स्थानकाकडे येण्यासाठी सोयीचा होईल असे नागरिकांतून बोलले जात आहे खडकी येथून नांदेड व आदिलाबाद कडे जाणाऱ्या हे सोयीचे असल्यामुळे सरसम येथील नागरिकांना सुद्धा सोयीचे होईल असे नागरिकांतून बोलले जात आहे सदरील निवेदनावर शेतकऱ्यांची सह्या आहेत.

Previous articleजिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलरच्या विद्यार्थ्यांची पारले जी कंपनीला भेट..
Next articleव्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या वार्षिक सभेत गोंधळ