अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी
खामगाव- शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता तत्पर असलेल्या जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर च्या वतीने शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. आज १७ डिसेंबर रोजी खामगांव येथील पारले-जी बिस्कीटचे उत्पादन करणाऱ्या शिवांगी ब्रेकर्स कंपनीला शैक्षणिक भेट देण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्याना चित्र फित द्वारे कंपनी बद्दल माहिती देण्यात आली.तसेच बिस्कीट चॉकलेट कसे बनते याबद्दल माहीत देण्यात आली .यावेळी विद्यार्थ्याना उत्पादन विभागात नेऊन प्रत्यक्ष बिस्कीट बनवताना दाखविण्यात आले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्याना बिस्कीटचे वाटप करण्यात आले.
यावेळी संस्थेच्या सचिवा प्रा. सौ सुरेखाताई , शाळेचे मुख्याध्यापक संतोष अल्ल्हाट सर , शिवांगी ब्रेकर्सचे पारले ऑफिसर सचिन पाठक साहेब, को-ऑडिनेटर राजकुमार दीक्षित साहेब यांच्या समवेत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या शैक्षणिक सहलीत विद्यार्थ्यांनी बिस्कीट उत्पादनाच्या माहिती बरोबरच मनसोक्त आनंद लुटला. सहली दरम्यान सर्वच विद्यार्थी आनंदी दिसले.