पेसा आधिकारी / कर्मचारी यांचा प्रशिक्षणार्थी म्हणून मोठया संख्येने सहभाग
हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नंबर – 8983319070
महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग व यशदा पुणे प्रस्थावित पंचायतराज प्रशिक्षण केंद्र कोसबाड़ हिल जिल्हा परिषद पालघर व जिल्हा परिषद नाशिक यांच्या संयक्त विद्यमाने दि.7 डिसेंबर ते 9 डिसेंबर 2022 रोजी पंचायत समिती देवळा येथे गावस्तरीय ग्रामस्वराज्य अभियान अंतर्गत पेसा क्षेत्रातील गावस्तरीय आधिकारी व कर्मचारी यांच्या करिता प्रशिक्षण व क्षमता बांधणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
ग्रामपंचायतीचा सर्वागीण विकास साधण्या करिता प्रशिक्षण व क्षमता बांधणी कार्यक्रमाचे आयोजन आवश्यक असल्याचे प्रतिपादन नाशिक जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी आधिकारी रविंद्र परदेशी यांनी उद्घघाटन प्रसंगी केले. प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घघाटन जिल्हा परिषद नाशिक च्या मुख्य कार्यकारी आधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते क्रांतिवीर बिरसा मुंडा यांचे प्रतिमा पुजन करुन करण्यात आले. त्यावेळी पेसा क्षेत्रात पंचायत क्षेत्र विस्तार कायद्याचा प्रसार व प्रचार होणे गरजेचे असुन गावस्तरीय आधिकारी व कर्मचारी यांनी गावाच्या विकासाकडे लक्ष दयावे असे प्रतिपादन केले.
प्रशिक्षण केंद्राचे प्राध्यापक राजेश लोखंडे सर यांनी पेसा कायदयाचा इतिहास व पाश्वभुमी व पेसा नियम 2014 ची अंमलबजावणी, सामुहिक वनहक्क व्यवस्थापन, आदिवासी भागाच्या शासकीय योजना, अनुसुचीत क्षेत्रामध्ये ग्रामसभेचे महत्व व ग्रामसभेचे आधिकार, आमचा गाव व आमचा विकास यामध्ये ग्रामपंचायतीची भूमिका व सहभाग, पाणी साठयाचे नियमन व व्यवस्थापण, शाश्वत विकासाचे ध्येय, पेसा क्षेत्रातील गावस्तरीय आधिकारी यांचे कर्तव्य व जबाबदारी इ. विषयांवर यशदा प्रशिक्षक व सिने स्टार संजय गंगावणे, सचिन पवार, यशदा प्रशिक्षक रुपाली ठाकरे यांच्या सह सखोल असे मार्गदर्शन केले.
126 प्रशिक्षणार्थीनी यात प्रशिक्षणाचा लाभ घेतला असून समारोपीय कार्यक्रमा प्रसंगी पंचायती समितीचे गटविकास आधिकारी राजेश देशमुख यांच्या हस्ते उपस्थित प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र व वाचन साहित्य देण्यात आले.
नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी आधिकारी आशि मा मित्तल व मुख्य कार्यकारी आधिकारी ग्रामपंचायत विभागाचे रविंद्र परदेशी यांच्या आदेशाने तसेच गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव सर डॉ. म. स. गोसावी, विभागीय सचिव प्रभाकर राऊत, कोसबाड़ केंद्राच्या समन्वयक अंजली कुलकर्णी ज्यांच्या पासुन खाली शिबिराचे आयोजन करण्यात आले, असे केंद्राचे प्राध्यापक राजेश लोखंडे यांनी समारोपाच्या कार्यक्रमा प्रसंगी सांगितले.