सरपंच व सरपंच पती यांच्या वाढदिवसानिमित्त आगळा वेगळा उपक्रम.
अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी 7709759836
भुमिराजा न्यूज नेटवर्क
भंडारी:-आजच्या या युगात वाढदिवसावर लाखो रूपये खर्च होतात.पण सरपंच व सरपंच पती यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त वायफळ खर्चाला फाटा देत स्पर्धा परीक्षेची पुस्तके भेट देऊन वाढदिवस साजरा केला आहे.
हॉल, मंडप, डेकोरेशन यावर अवाढव्य खर्च करत वाढदिवस साजरा करण्याची परंपरा सध्या समाजात जोमात सुरू असून, तरी देखील समाजासाठी, गावकऱ्यांना आपण काही देणे लागतो. या भावनेतून सामाजिक बांधिलकी जोपासत भंडारी येथील सरपंच वैशालीताई व सरपंच पती शैलेंद्र बिल्लारे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त स्वामी विवेकानंद अभ्यासिकेला स्पर्धा परीक्षा पुस्तके भेट देऊन समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.यावेळी सरपंच वैशाली बिल्लारे, उपसरपंच दुर्गाताई बोंबटकार,अनिता बिल्लारे,निर्मला भारसाकळे, महादेव चोपडे, तंटामुक्ती अध्यक्ष सुनिल डामरे,ग्रामसेवा सोसायटी अध्यक्ष प्रल्हाद चोपडे, प्रमोद बिल्लारे, विजयसिंह पवार,अनिल भारसाकळे,सोपान वाघ, विजयसिंह जाधव,राजु बोंबटकार, नारायण चोपडे, गजानन बाजोडे, शांताराम बाजोडे, भिकाजी बोंबटकार,अमोल बोंबटकार,पवण बोंबटकार, सुनिल चोपडे, प्रल्हाद चोपडे,आकाश घोडके, भिकाजी सुरडकर,गिताबाई चोपडे, लक्ष्मीबाई शिंबरे, महेश चोपडे,रवि चोपडे, आदित्य पवार आदी गावकरी उपस्थित होते.