पुणे दि. 10 – पुण्यातील कसबा पेठेत शनिवार वाड्याजवळ मुख्य रस्त्यालगत युनिव्हर्सल हॉस्पिटल हे एक मोठे हॉस्पिटल आहे. पुण्याच्या मध्यभागी असणारे, सर्व सोयी सुविधा युक्त, सर्व प्रकारच्या मान्यताप्राप्त, त्याधुनिक आणि अत्यावश्यक असणाऱ्या सर्व सेवा, सुविधा आणि शस्त्रक्रिया करण्यासाठी युनिव्हर्सल हॉस्पिटल जगात प्रसिद्ध आहे. दुबई, ऑस्ट्रेलिया, द. आफ्रिका, इंग्लंड, युक्रेन, कझाकिस्तान, रोमानिया, इटली ई. देशातील परदेशी नागरिक हजारो किलोमीटर प्रवास करून, येथे उपचार घेताना सर्वसामान्यांना नित्याने दिसतात. इतर हॉस्पिटलमध्ये परदेशी नागरिकांचा वावर अभावानेच आढळत असताना युनिव्हर्सल हॉस्पिटलमध्ये मात्र कायमच परदेशी नागरिक विश्वासाने उपचारासाठी येथे येत असल्याचे चित्र नेहमीच पाहायला मिळते.
रुग्णांना मोफत उपचार मिळाले पाहिजेत, रुग्णांना मोफत उपचारांचा हक्क आणि अधिकार मिळाला पाहिजे, यासाठी राज्यात मोठी व्यापक चळवळ निर्माण करणारे सामाजिक कार्यकर्ते उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणारी आंतरराष्ट्रीय दर्जाची आयएसओ मानांकित रुग्ण हक्क परिषद ही संघटना आणि युनिव्हर्सल हॉस्पिटल, पुणे यांनी एकत्रितपणे काम करण्याचा कायदेशीर निर्णय घेतला असून नुकत्याच यासंबंधीचा करार झाल्याचे रुग्ण हक्क परिषदेचे केंद्रीय सचिव श्री. संजय जोशी आणि युनिव्हर्सल हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ. अनंत बागुल यांनी सांगितले.
पैसे नाहीत म्हणून गरीब रुग्णांना दर्जेदार उपचार मिळविण्यासाठी कुठेही वण – वण फिरावे लागणार नाही. युनिव्हर्सल हॉस्पिटल मधील समाजसेवा विभाग आणि मोफत वैद्यकीय मदत मार्गदर्शन कक्ष गरीब रुग्णांना प्राधान्याने मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यासाठी नेहमीच कटिबद्ध राहील, अशी हमी रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी दिली.
रुग्ण हक्क परिषद आणि युनिव्हर्सल हॉस्पिटल यांनी एकत्रितपणे 1 डिसेंबर 2022 पासून रुग्णांना सेवा देण्याचे कार्य आरंभले असून यासंबंधी स्वागत समारंभ आणि पानसुपारीचा कार्यक्रम 20 डिसें. 2022 रोजी सायं. 05.00 वाजता युनिव्हर्सल हॉस्पिटल येथेच होणार आहे, तरी सर्वांनी या शुभेच्छा समारंभ कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आग्रहाने रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी सर्वांनाच निमंत्रित केले आहे.