नासिर शहा
पातूर तालुका प्रतिनिधी
पिंपळखुटा : ग्राम पिंपळखुटा,तालुका-पातुर जिल्हा-अकोला येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा पिंपळखुटा मधील सर्वत्र गावकरी मंडळींच्या वतीने “श्री संत तुळसाबाई पुण्यतिथी यात्रा महोत्सव” साजरा करण्यात येत असतो त्याचप्रमाणे याही वर्षी सुद्धा “यात्रा महोत्सव” साजरा करण्यात येत आहे हे वर्ष 46 वे असून मागील कोरोनाच्या दोन वर्षाच्या लॉकडाऊन नंतर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.या कार्यक्रमाची रूपरेषा अशी राहते की श्री संत तुळसाबाई चा अभिषेक करून श्री संत गजानन महाराज विजय ग्रंथाचे पारायण होते व गावातून टाळकरी व भक्तमंळी सह श्रींचे मोठ्या थाटात टाळ मृदंग झेंडे विना यांच्या जयघोषामध्ये मिरवणूक करण्यात येते व नंतर दुपारी बारा ते चार पर्यंत महाप्रसादाचे वितरण होते या यात्रेला तालुक्यातील व पंचक्रोशीतील हजारोच्या संख्येने भाविक भक्त उपस्थित असतात व या यात्रेला यात्रेकरूंचे दुकाना असतात व लहान मुलांकरिता खेळणे सुद्धा असतात. या यात्रेमध्ये सर्व पोलीस बंदोबस्त पोलीस स्टेशन चांनी चे ठाणेदार व पूर्ण पोलीस स्टाफ यांचा बंदोबस्त राहतो.श्री संत तुळसाबाई संस्थान पिंपळखुटा यांच्यावतीने याही वर्षी सुद्धा सर्वत्र भाविक भक्तांना हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे व दर्शनाचे व महाप्रसाद घेण्याचे आवाहन केलेले आहे.