Home Breaking News शेतकरी आत्महत्या रोखण्यात शासन; करते अपयशी

शेतकरी आत्महत्या रोखण्यात शासन; करते अपयशी

अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांचे तिखट प्रतिपादन

भुमिराजा न्यूज प्रतिनिधी रविकुमार पवार खडकीकर मो.7350333415

तामसा राज्यातील शेतकऱ्यांच्या अनंत समस्या असताना त्या दूर करण्याऐवजी शासनातर्फे धार्मिक भावनिक मुद्दे पुढे करून राजकारण करण्यात मश्गूल झाले आहेत. शासनकरते शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यापासून रोखण्यासाठी अपयशी ठरल्याचे तिखट प्रतिपादन अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी वडगाव बु तालुका हादगाव येथे गुरुवारी सायंकाळी आयोजित शेतकरी मेळाव्यात केले.
शेतकरी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी तंटामुक्ती अध्यक्ष केशवराव पवार होते. मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून छावाचे प्रदेशाध्यक्ष पंजाबराव पाटील काळे जिल्हाध्यक्ष दशरथ पाटील कपाटे विद्यार्थी आघाडीचे जिल्हा सरचिटणीस गणेश पाटील कपाटे ,विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष , स्वप्निल पाटील रातोळीकर, मुस्लिम आघाडीचे जिल्हाध्यक्ष सत्तार पठाण, नायगाव तालुका अध्यक्ष प्रताप कदम, हदगाव तालुका अध्यक्ष दिनेश पवार हे होते
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले.
शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना नानासाहेब जावळे पाटील म्हणाले की तरुणांनी सुरक्षित होऊन शेती व उद्योगाला प्राधान्य द्यावे. सततच्या नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्या होणे ही दुर्दैवी बाब आहे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व शंभर टक्के अनुदानाच्या कृषी योजना चा आधार देऊन शेतीला कायमस्वरूपी सिंचनाची व्यवस्था केल्यास शेतकरी आत्महत्येचा विचार सोडून उत्साहाने शेती करेल. विविध पक्षातील गटामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबात गटातटाच्या शिरका होऊन शेतकऱ्यांचे वाटोळे होत आहे. या धोक्यापासून शेतकऱ्यांनी कुटुंबाला वाचवण्याची आव्हान शेवटी नानासाहेब जावळे पाटील यांनी केले. प्रदेशाध्यक्ष पंजाबराव जी काळे पाटील, छावाचे जिल्हाध्यक्ष दशरथ कपाटे सह अनेकांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप पवार यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जिल्हा सरचिटणीस गणेश पाटील कपाटे यांनी केले तर आभार हातगाव तालुका अध्यक्ष दिनेश पवार यांनी मानले
यावेळी छावा चे कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मारुती पाटील ऋषिकेश पवार,स्वप्नील पवार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
उल्लेखनीय बाब म्हणजे नानासाहेब जावळे पाटील यांनी शिवनी ,वडगाव ,कोळगाव ,पाथरड ,तामसा येथे अखिल भारतीय छावा संघटनेच्या नाम फुलकाच्या अनावरण केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक छावा कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले विद्यार्थी आघाडीचे जिल्हा सचिव ऋषिकेश पवार तालुका सचिव स्वप्निल पवार, मारुती पाटील ज्ञानेश्वर पवार ,शंकर पवार अभिकदम, आत्माराम पवार मारुती शिंदे, प्रणव आगलावे, शिव प्रसाद लाभशीटवार, कृष्णा पाटील वटफळीकर, उबाळे पाटील इत्यादी कार्यकर्ता कर्त्यांनी परिश्रम घेतले..

Previous articleमाता चिंदलदेवी देवस्थान येथे भाविकांना घेतला महाप्रसाद लाभ.
Next articleआज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन.