Home गुन्हेवृत्त हुंडयासाठी सासरच्यां मंडळींकडून शारीरीक व मानसिक छळ;

हुंडयासाठी सासरच्यां मंडळींकडून शारीरीक व मानसिक छळ;

छळाला कंटाळून हिमायतनगर तालुक्यातील वारंगटाकळी येथील नवविवाहितेने केली गळफास घेऊन आत्महत्या..

भुमिराजा न्यूज प्रतिनिधी
रविकुमार पवार खडकीकर
मो.7350333415

हिमायतनगर पोलीस ठाण्यात सासू, सासरा, नवऱ्यासह आठ जणा विरुद्ध ग गुन्हा दाखल; तिघांना अटक, 5 जणांच्या शोधत पथक रवाना..

हिमायतनगर/-लग्नातील हुंडयाच्या राहिलेल्या रक्कमेसाठी सासरच्यां मंडळींकडून शारीरीक व मानसिक छळ होत असल्याने या छळाला कंटाळून वारंगटाकळी येथील एका १९ वर्षीय नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि.०२ डिसेंबर शुक्रवारी घडली आहे. या प्रकरणी विवाहितचे माहेरच्यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिमायतनगर पोलीस ठाण्यात सासू, सासरा, नवऱ्यासह आठ जणा विरुद्ध गुन्हा आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सासरच्या मंडळींना अटक करण्यात आली असून, यातील अन्य ५ जणांना अटक करण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, सायाळ ता. जि. हिंगोली येथील विवाहिता मोनिका मस्के हीच विवाह हिमायतनगर तालुक्यातील मौजे वारंगटाकळी येथील युवक लक्ष्मण मारोती देवकते यांच्यासोबत मागील सहा महिन्यापूर्वी झाला होता. लग्नानंतर सासरच्या मंडळीने नवविवाहित मोनिका हिस चांगली वागणूक दिली. त्यानंतर लग्नात राहिलेला हुंडा घेऊन ये आणि घर बांधकामासाठी ५ लाख रुपयांची मागणी करून वारंवार शारीरीक व मानसिक छळ सुरु केला. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहितेने याबाबतची माहिती माहेरच्यांना दिली होती. त्यानंतर काही दिवस चांगली वागणूक देऊन पुन्हा विवाहितेचा छळ सुरु होता. हा त्रास आणि सततचा छळ सहन होत नसल्याने विवाहिता सौ. मोनिका लक्ष्मण देवकते वय १९ वर्ष हिने राहत्या घरातच ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्देवी घट दि. ०२ डिसेंबर रोजी घडली.

आपल्या मुलीने आत्महत्या केल्याचे समजताच नवविवाहितेचे वडील शिवाजी मोहन मस्के वय ४२ वर्ष रा. सायाळ ता. जि. हिंगोली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोनिकाच्या सासरकडील एकूण आठ जणा विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात लक्ष्मण मारोती देवकते (पती), मारोती देवकते (सासरा), सौ.लक्ष्मीबाई देवकते (सासु), कोमल मस्के (नंदन), बालाजी देवकते (भाया), सौ.पूजा देवकते (जाऊ), तानाजी देवकते (चुलत सासरा), सौ. राधाबाई देवकते (चुलत सासू) रा. सर्व मौजे वारंगटाकळी यांच्या विरुद्ध गुन्हा र. नं. २७२/२२ भांदवीच्या कलम ३०४ (ब) ४९८ (अ) आयपीसी अक्ट ३४ व हुंडा प्रतिबंधक कायदा ०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील सर्व आरोपीने संगणमत करून लग्नातील राहिलेली उर्वरित रक्कम आणि घर बांधकाम करण्यासाठी पाच लाख रुपये घेऊन ये अशी मागणी करून मयत सौ. मोनिका हिस शारीरिक व मानसिक त्रास दिल्यामुळेचं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तिने उचललेल्या या कठोर पाउलास वरील आठ जण कारणीभूत असल्याचे विवाहितेच्या पित्याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. यावरून पोलीस निरीक्षक बी.डी. भुसनूर यांनी तातडीने गुन्ह्याची नोंद करून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी यांच्याकडे सोपविला आहे. एकूणच विवाहितेच्या मृत्यूच्या घटनेमुळे सासरच्या मंडळींविरुद्ध जनप्रक्षोभ वाढला आहे. अश्या घटना पुन्हा होणार नाहीत यासाठी पोलिसांनी सर्व आरोपींवर कठोरात कठोर कार्यवाही करण्यासाठी सबळ पुराव्यानिशी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करावे अशी मागणी केली जात आहे.

Previous articleचान्नी येथे एका वर्षाच्या लहान मुलीवर माकडाचा हल्ला
Next articleभोकर विधानसभेच्या धर्तीवर, हिमायतनगर तालुक्याचा विकास का? होऊ नये!