Home Breaking News चान्नी येथे एका वर्षाच्या लहान मुलीवर माकडाचा हल्ला

चान्नी येथे एका वर्षाच्या लहान मुलीवर माकडाचा हल्ला

नासिर शहा
पातूर तालुका प्रतिनिधी
पिंपळखुटा*. आलेगाव वन विभागा अंतर्गत येत असलेल्या चान्नी येथे एका माकडांनी केलेल्या हल्ल्यात एका वर्षाच्या लहान मुलीवर माकडाने अचानक हल्ला केल्याची घटना २ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता घडली आहे. पातुर शहरासह तालुक्यातील चान्नी येथे माकडांचा हैदोस सुरू असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. या माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. माकडाचे हल्ले. कुत्र्याचे हल्ले रानडुकराचे हल्ले वाढतच चालले असून वन विभाग मात्र सुस्त आहे की काय असा प्रश्न ग्रामस्थांन कडून बोललं जातं आहे. मात्र कित्येक तर गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये कुत्र्याच्या हल्ल्यात चतारी येथील एक विद्यार्थी तसेच रानडुकराच्या हल्यामध्ये झरंडी येथील एक नागरिक सुद्धा गंभीर जखमी झाले होते.या घटनेनंतर शुक्रवारी चान्नी या गावात माकडांनी हैदास घातला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ३ वर्गात शिक्षण घेत असलेली राणी बबन सोळंके वय (९) वर्षाची ही लहान मुलगी ट्युशन वरून परत येत असताना तीच्यावर माकडाने अचानक हल्लयाने ही लहान मुलगी चांगलीच घाबरली आणि तिने आरडा ओरडा करण्यास सुरुवात केली.तिच्या किंचाळया ऐकूण आई सह ग्रामस्थ धावत आले. जखमी मुलीला माजी सरपंच दशरथ सदार, पत्रकार मनोहर सांनी त्या मुलीला गावातील एका प्रायव्हेट
यामध्ये उपचारार्थ नेले होते. एका वृत्तपत्राच्या प्रतिनिधीनी वन विभागाशी संपर्क साधला असता समाधानकारक उत्तर दिले नाही. या प्रकाराकडे वन विभाग माकडे पकडण्यासाठी उठले कठोर पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या माकडांच्या अश्या प्रकारच्या हल्ल्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वन विभागाने माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

हल्ल्यात एका वर्षांची मुलगी जखमी या लहान मुलीचे नाव राणी बबन सोळंके असल्याचे सांगण्यात येते आहे. माकडाने केलेल्या या हल्ल्यात राणी हिच्या हातावर आणि कमरला थोडे बोरकाटले आहे. या घटनेनंतर तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. या मुलीवर झालेल्या हल्ल्याबद्दल त्या परिसरात खळबळ उडाली आहे.
च्या हल्ल्यांपासून सावधान

Previous article*विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वादिनी यंदाही माणुसकी प्रती करूया रक्तदान उपक्रमाचे आयोजन*
Next articleहुंडयासाठी सासरच्यां मंडळींकडून शारीरीक व मानसिक छळ;