Home Breaking News नायकीर सोगन’ कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे:* जगदीश जाधव यांचे आव्हान

नायकीर सोगन’ कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे:* जगदीश जाधव यांचे आव्हान

भुमिराजा न्यूज प्रतिनिधीर विकुमार पवार खडकीकर मो.7350333415

गोर सिकवाडी , गोर सेना यांच्या वतीने ५ डिसेंबर रोजी ‘ नायकीची शपथ ‘ या कार्यक्रमाचे आयोजन मौजे हिमायतनगर (परमेश्वर मंदिर मंगल कार्यालय)या ठिकाणी करण्यात आलेले आहे . या कार्यक्रमाला तमाम बंजारा समाजातील मान्यवरांनी उपस्थित राहण्याचे आव्हान गोर सेना जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जगदीश जाधव यांच्या वतीने करण्यात आलेले आहे . ज्यांच्या नावाने महाराष्ट्रातील राजकारणाची व्याख्याच पूर्ण होऊ शकत नाही असे नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतरावजी नायक साहेब यांनी ५ डिसेंबर १ ९ ६३ या दिवशी मुख्यमंत्री पदा ची प्रथमः शपथ घेतली होती . त्या दिवसाचे ओचित्य साधून ५ डिसेंबर हा दिवस गोर सिकवाडी , गोर सेना यांच्याकडून ‘ नायक दिन ‘ असल्यामुळे त्या दिवसाची शपथ घेण्याचा तमाम बंजारा समाजासाठी दैदीप्यमान ठरणारा हा दिवस असल्यामुळे या दिवशी सर्व समाज बांधवांनी नायकाची शपथ घेण्यासाठी हिमायतनगर येथे उपस्थित राहण्याचे आयोजन तमाम गोर सैनिक यांच्याकडुन करण्यात आलेले आहे.महानायक वसंतरावजी नायक साहेब यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात तब्बल ११ वर्ष २ महिने १६ दिवस महाराष्ट्र मध्ये एक वेगळ्या प्रकारे विविध सामाजिक क्रांती घडवून आणली या नायकी शपथ कार्यक्रम मध्ये विभागीय संयोजक देविदास नेळावत प्रमुख वक्ते यांची बंजारा बांधवासाठी खास वैचारिक मेजवानी होणार आहे . तसेच नांदेड जिल्ह्यातील सर्व गोर सेना,गोर सिकवाडी चे पदाधिकारी उपस्थिती लाभणार आहे . या स्वाभिमानाचा दिवस उत्साहाने साजरा करण्यासाठी तसेच तमाम गोर बंजारा बांधवासाठी अलौकिक आणी अभिमाना चा दिवस असल्याने त्या दिवसाचे औचित्य साधून हिमायतनगर (परमेश्वर मंदिर मंगल कार्यालय) येथे मध्ये सर्व गोर बंजारा समाजबांधवांनी नायकीची शपथ घेण्यासाठी उपस्थित राहण्यांचे आव्हान गोर सेनेचे जिल्हा प्रशिध्दी प्रमुख जगदीश जाधव यांनी केले आहे.

Previous articleग्रामपंचायत शेळदमध्ये सौ.अर्चना पंजाबराव तिडके यांनाच पक्षाने उमेदवारी द्यावी…….
Next article*विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वादिनी यंदाही माणुसकी प्रती करूया रक्तदान उपक्रमाचे आयोजन*