कार्यालयीन प्रतिनिधी भूमीराजा न्युज.
बाळापूर तालुक्यातील शेळद ग्रामपंचायतमधे स्व.गजानन भाऊ लांडे यांच्या निधनानंतर पहिलिच निवडणूक आहे. या ग्रामपंचायत मधे आजपर्यंत वंचित बहुजन आघाडीचीच सत्ता राहिलेली आहे. परंतु या पंचवार्षिक सत्तेचे वैशिष्ट्ये म्हणजे पक्षाचा विद्यमान सरपंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अखंड प्रेमात पडलेला असल्यामुळे त्याचप्रेमापोटी व मैत्रीखातर ग्रा.पं.सदस्यपद आंदनात राष्ट्रवादी पक्षाला बहाल केले हा इतिहास आहे.
..सद्या तेच सरपंच वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवारी मागत आहेत. अशा निष्ठा विकणाऱ्या व पक्षाची विचारधारा मातीत गाडणार्या व्यक्तीला पक्षाने पुन्हा उमेदवारी दिल्यास पक्षाचा पराभव निश्चित आहे. म्हणून पक्षनेत्रूत्वाला विनंती करण्यात येते की उमेदवारी देऊन पक्षाला पराभवाच्या खाईत ढकलू नका.
आता राहिला प्रश्न सौ.अर्चना पंजाबराव तिडके यांनाच उमेदवारी का? तर सौ.अर्चना पंजाबराव तिडके ह्या मागील पं.स.निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार होत्या. तेव्हा तिरंगी लढत झाली. सेनेचा उमेदवार निवडून आला.सेनेचा उमेदवार कसा निवडून आला याचा शोध पक्षनेत्रूत्वाने जरूर घ्यावा. “जनता सब जानती है”
सौ.अर्चना तिडके यांचा मुलगा” शुभम “हा हाडाचा कार्यकर्ता आहे. त्याने महिला जिल्हाध्यक्षा प्रभाताई सिरसाट यांच्या समक्ष काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला आहे. त्याला माननारा मुस्लिम व हिंदू समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. सौ.तिडके यांचे पती तीस-पस्तीस वर्षांपासून वकिली व्यवसाय करीत असून सामाजिक, राजकीय क्षेत्रात ते वजनदार व्यक्ती म्हणून सर्वपरिचित आहेत.त्याचबरोबर भिकुंडखेड,शेळद व अकोला नाक्यावरील बुध्दीजीवींचा पाठिंबा त्यांना आहे. या सर्व जमेच्या बाजू सौ.तिडके यांच्या कडे आहेत. स्व.गजानन लांडे यांच्या नंतर पक्षाची धुरा त्यांचे सुपूत्र रणजीत लांडे यांच्या वर आलेली आहे. रणजीत याच्यासोबत नव्या-जून्या कार्यकर्त्यांची फळी आहे अशाप्रकारचे सौ.अर्चना पंजाबराव तिडके या सरपंच पदाच्या उमेदवार बौध्द” असून त्यांच्या सोबत जे नऊ उमेदवार पँनलमधे आहेत त्यामधे
बौद्ध -03 ,मुस्लिम-03 कुणबी-01,
पाटील-01,भोई -01.
अशी एकुण सामाजिक समिकरणाची सांगड घातली असून पक्षाने सौ अर्चना पंजाबराव तिडके यांना सरपंच पदासाठी लागणारे ए.बी.फार्म देऊन वंचित बहुजन आघाडीला बळकटी देऊन व नव्या दमाच्या तरुणांना राजकारणात प्रोत्साहन द्यावे.
ग्रामपंचायत शेळद निवडणूक-2022
नवीन फ्रेश चेहऱ्यांना यंदाच्या शेळद ग्रामपंचायत मधे जाण्यास योग्य वातावरण निर्माण झाले आहे. सरपंच पद अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव आहे. या ग्रामपंचायत मधे अकोला नाका परिसरातील रहिवासी,प्रसिद्ध विधिज्ञ अँड पंजाबराव तिडके सर्वांना परिचित असं व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचा संपूर्ण कार्यकाळ बाळापूर न्यायालयात गेल्याने सर्वच जातीधर्माचे लोक त्यांना ओळखतात.
.अँड.पंजाबराव तिडके यांनी पंचवीस वर्षांपूर्वीच तेव्हाच्या भा.रि.प.बहुजन महासंघामधे श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या समक्ष पक्षामध्ये प्रवेश घेतला होता. म्हणजे ते मुळचे श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी जुळलेले आहेत. त्यांच्या पत्नी सौ अर्चना पंजाबराव तिडके ह्या शेळद ग्रामपंचायत सरपंच पदाच्या उमेदवार आहेत. त्या जरी मागील पं.स.निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढलेल्या असल्यातरी त्या आता स्वगृही परतलेल्या आहेत विशेष म्हणजे नुकतीच बाळापूरातून राहूल गांधी यांची “भारत जोडो यात्रा”गेली. काँग्रेसमय वातावरण निर्मिती होत असताना सौ.अर्चना तिडके यांनी वंचित बहुजन आघाडीमधे प्रवेश घेतला आहे. त्यामुळे पक्षनेत्रूत्वाने त्यांनाच उमेदवारी देऊन वंचित बहुजन आघाडीची ग्रामपंचायतीमधील सत्ता कायम ठेवावी.धन्यवाद!!
असे विचार
प्रा. भिलंगे. यांनी व्यक्त केले आहेत.
नाका,बाळापूर. मोबाईल (9767670341)