हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नंबर – 8983319070
गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसाना सहकार्य करण्यासाठी महत्वाचे काम करणाऱ्या पोलिस पाटलांना विशेष उल्लेखणीय सेवा पुरस्कार व उल्लेखणीय शौर्य पुरस्कार देण्यात येणार आहेत. पोलिस पाटलांनी केलेले विशेष उल्लेखणीय काम, अतुलनीय साहस यासाठी राज्यपाल पुरस्कार देण्यासाठी गुरुवारी ( 1 डिसेंबर ) गृह विभागाने निर्णय घेतला आहे. या पूरस्कारा साठी निवड करण्या करीता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षते खाली जिल्हा निवड समिती गठीत करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. राज्यपालांच्या सहीचे प्रशस्तीपत्र व पंचवीस हजार रुपये, असे पूरस्कारा चे स्वरुप आहे.