हजेरी बुक मागीतल्यावरुन वातावरण तापले
अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी
संभापूर:- येथील ग्रामपंचायत सदस्यांची मासिक सभा दि २९/११/२२ रोजी घेण्यात आली होती. संभापूर ग्रामपंचायतीची मंगळवारी मासिक सभा घेण्याची नोटीस सर्व सदस्यांना पाठविण्यात आली होती. त्यानुसार मंगळवारी सकाळी सभा सुरू केली. सचिव सि एम जाधव, सरपंच ज्योती पवार, उपसरपंच राष्ट्रपाल दांडगे, सदस्य मधुकर गवारगुरु,प्रिती शेगोकार, गजानन गावंडे, गजानन जुमळे,नंदा घोंगे सदस्यांची उपस्थिती होती. मात्र हजेरी बुक मागीतल्यावरुन वाद सुरू झाला. त्यानंतर अन्य काही प्रश्नांना ग्रामविकास अधिकारी जाधव यांनी समाधान कारक उत्तरे दिली नाहीत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सदस्यांनी सह्या करण्यासाठी हजेरी बुक मागीतले असता, सचिव जाधवांनी हजेरी बुक बंद झाले आहे असे सांगितले. यावरून सदस्य, सरपंच,सचिवांमध्ये वाद सुरू झाला.
गावात कोणत्याही प्रकारची कामे होत नाहीत, योजनेची माहिती दिली जात नाही, अपंगांच्या निधी बद्दल विचारले असता,त्यांचा निधी आलेला नाही असे उडवा उडविचे उत्तर सचिव जाधव यांच्या कडून देण्यात आले. यावरून वातावरण तापले. हजेरी बुक बंद झाले तर सदस्य प्रिती शेगोकार यांनी लेखी स्वरूपात मागीतले. यावर सचिव भडकले आणि जिथे तक्रार करायची करा. त्यांनी बोलून दाखवले. याआधी सि एम जाधव यांच्या तक्रारी करूनही त्यांच्या वर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही. वरीष्ठ अधिकारी पाठराखण करत असल्याचा आरोप सदस्यांनी केला.