Home Breaking News गुजरात निवडणुकीचा अलौकिक जुमला; भारतीय जुमला पार्टी (BJP)

गुजरात निवडणुकीचा अलौकिक जुमला; भारतीय जुमला पार्टी (BJP)

कार्यालयीन प्रतिनिधी

◆ गुजरात राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीचा ज्वर मतदारापेक्षा राजकीय पक्षात संचारला आहे। विशेषतः तो BJP मध्ये अधिक चढलेला दिसून येत आहे।
◆ गेल्या अनेक निवडणुकामध्ये BJP ने अनेक आश्वासने दिलीत पण ते नंतर *”निवडणूक जुमला”* ठरले, हे मतदार/ जनता जाणून आहेतच। आताच्या गुजरात विधानसभा निवडणुकीत BJP ने एक कोलांट जुमला प्रचारात आणला। पण तो जनतेला समजलेला दिसत नाही, तसेच मीडिया व वर्तमानपत्रे यांनी त्यावर अजून (अपवाद वगळता) का भाष्य केले नाही ? याचे आश्चर्य वाटते। राजकीय विश्लेषक यांनी सुद्धा यावर आतापर्यंत फार काही सिरीयस घेतलेले दिसत नाही।
◆ तर मुद्धा असा आहे की, BJP ने निवडणूक प्रचारात लोकांना आश्वासन दिले की, पुढील जागतिक ऑलिम्पिक स्पर्धा गुजरात मध्ये होणार ! मग काय लोक खुश !! मानलं की तेथे मोठमोठे स्टेडियम आहेत, पण त्यावर ते भागेल का ? ही शंका लोकांच्या मनात का येत नाही ? दुसरे म्हणजे जागतिक ही स्पर्धा देशाला मिळणार आहे, गुजरातला नाही। मग गुजरात कसे काय जाहीर करू शकतात ? देशाची क्रीडा आयोजन समिती गृहीत धरावी की नाही ? बरं ह्या जागतिक स्पर्धा कोणत्या वर्षी होणार आहेत ? याचाही अश्वासनामध्ये उल्लेख नाही।
★ आता ऑलिम्पिक बद्दल असे की, 2024, 2028, 2032 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांचे बुकिंग ऑलरेडी इतर देशात अगोदरच झालेले आहे। या स्पर्धा त्या-त्या देशात होतील। 2036 किंवा त्यापुढील स्पर्धा भारतात घेण्याबद्दल आपण दावा करणे अजून गुलदस्त्यात आहे। तशी मागणी केली तर 2036 किंवा त्यापुढील ऑलिम्पिक स्पर्धा आपण मंजूर झाल्यास आयोजित करू शकणार आहोत। म्हणजे आजपासून 14 वर्षानंतर होणाऱ्या स्पर्धेबाबत आपण क्लेम करू शकणार आहोत। म्हणजेच आपण त्यानंतरच ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमान राहू शकतो।
■ हे असे क्लिअर-क्लिअर असतांना BJP मार्फत असल्या प्रकारचे ह्युमर लोकांना फसविण्यासाठी वापरल्या जाते ? यातून लोक सावरले पाहिजेत, जागृत झाले पाहिजेत।
*भाजप ही भाजूप (भारतीय जुमला पार्टी) आहे, हेच खरं !!!*

= भीमराव तायडे,
नांदुरा (जिल्हा: बुलडाणा)
9420452123

Previous articleआंबेडकर कुटुंबीयाबद्दल आक्षेपार्थ बोलणाऱ्या जगदीश गायकवाड यांच्या निषेध आंदोलन करण्यात आले
Next articleसंभापूर ग्रामपंचायत च्या मासीक सभेत गोंधळ..!