हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नंबर – 8983319070
राज्यात आदिवासी विकास विभागांतर्गत येणाऱ्या ४९९ शासकीय आश्रमशाळांपैकी ३०० हून अधिक आश्रमशाळा ह्या दुर्गम ते अतिदुर्गम भागातील आहेत. जवळपास दोन लाख विद्यार्थी-विद्यार्थीनी ह्या आश्रमशाळांमध्ये राहून विद्यार्जन करतात. गोरगरीब परिवारातील ह्या आदिवासी मुलांच्या दोन वेळच्या जेवणाची जबाबदारी प्रशासनाची आहे. या आश्रमशाळांना अन्नधान्य पुरविण्यासाठी आपल्या स्तरावरून काढण्यात आलेले १२० कोटीचे कंत्राट सुकाणू समितीच्या टक्केवारीत रखडल्यामुळे ह्या निष्पाप गोरगरीब मुला-मुलींचे जेवणाचे अतोनात हाल होत आहे.
तरी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे मा. महोदयांना विनंती की, आदिवासी विकास विभागांतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय आश्रमशाळांना सुरळीत अन्नपुरवठा होण्यासाठी आपण जातीने लक्ष देऊन ह्या आश्रमशाळांमधील आदिवासी मुलांचे जेवणाचे हाल तात्काळ थांबवावे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे निवेदन देण्यात आले यावेळी प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर जिल्हाध्यक्ष गणेश मोरे कौशल पाटील मनोज गोवर्धने महेश लासुरे महाराष्ट्र सैनिक अक्षय कोंबडे आदी उपस्थित होते