Home Breaking News वाडेगाव- अकोला मुख्य रस्त्याचे काम रखडले.

वाडेगाव- अकोला मुख्य रस्त्याचे काम रखडले.

प्रवासी त्रस्त,अनेकांना मणक्याच्या आजार

प्रतिनिधी योगेश घायवट भूमीराजा न्युज

वाडेगाव:- अकोला वाडेगाव महामार्गाचे काम मागील अनेक वर्षांपासून सुरू असून या रस्त्याचे काम सतंगतीने सुरू असल्याने या रस्त्यावरून जाताना प्रवाशाला मोठी अडचण निर्माण होत आहे.
हा रस्ता एका बाजूने डांबरीकरण करण्यात आला असून दुसरी बाजू रुळी मुरूम टाकून तसाच रखडला आहे.रस्त्यावरून जाताना पूर्ण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धुळीचा सामाना करावा लागत आहे तर अनेक प्रवाशांना कंबर दुखीचा ,केस गळतीचा त्रासाला सामोरे जावे लागत आहे.गावा लागत व पुलाच्या जवळपास अर्धा किलोमीटर एवढा रस्ता अपूर्ण ठेवलेला आहे.अनेक लोकप्रतिनिधी यांनी वारंवार रस्त्यावबत निवेदन आंदोलन करून सुद्धा याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे.या मार्गावर गोरेगाव,मझोड, नकाशी,भरतपूर आदी गावे येतात.तरी सुद्धा रस्ता दुरुस्ती होईना सर्व प्रवाशाला जीव मुठीत घेऊन वाहनात या रस्त्यावरून प्रवास करावं लागतं आहे. याला ग्रामस्थ, प्रवाशी, विद्यार्थी वाहनचालक त्रस्त झाले आहेत.या रस्त्यावरून जाताना नेमके कोणत्या बाजुंने जावे ह्याच संकटात वाहनचालकांना राहावे लागते.

प्रतिक्रिया:-विनोद राहुडकार
तालुकाध्यक्ष मनसे बाळापूर
या रस्तावरून जातांना एका बाजूने डांबरीकरण झालेले आहे तर दुसऱ्या बाजूने मुरूम टाकून ठेवलेले आहे.दोन्ही वाहनांना बाजू देण्यासाठी एकाला वाहन टाकून जाऊ द्यावे लागते.तरी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्ता सुरळती करून घ्यावे अन्यथा मोठे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल

.नारायण सोनोने
वाहनचालक वाडेगाव

मी या रस्त्यावरून जातांना गाडीचे नुकसान तर होतच आहे.परंतु वाहन चालविताना वाहन खड्यातून न्यावे लागत परिणामी याचा शरीरावर ताण पडून मणक्याचा आजाराला सामोरे जावे लागत आहे.प्रशासनाने लोकप्रतिनिधी यांनी तत्काळ रस्ता दुरुस्ती करून घ्यावा.

Previous article*डॉ.शिवचरण उज्जैनकर जळगाव* * *डॉ. श्रीकांत पाटील कोल्हापूर* *शाहीर मनोहर पवार ,बुलडाणा*
Next articleशेगाव येथे वंचित बहुजन आघाडी चे आढावा संपन्न.बैठक