Home Breaking News *डॉ.शिवचरण उज्जैनकर जळगाव* * *डॉ. श्रीकांत पाटील कोल्हापूर* *शाहीर मनोहर पवार ,बुलडाणा*

*डॉ.शिवचरण उज्जैनकर जळगाव* * *डॉ. श्रीकांत पाटील कोल्हापूर* *शाहीर मनोहर पवार ,बुलडाणा*

*जिल्हा भूषण पुरस्काराने सन्मानित*

अँकर शितल शेगोकार भूमीराजा प्रतिनिधी*

ग्लोबल स्कॉलर फाउंडेशन, पुणे* तर्फे नुकतेच जिल्हा भूषण पुरस्कार आदर्श गाव योजनेचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष *पद्मश्री पोपटराव पवार* यांच्या शुभहस्ते अण्णाभाऊ साठे सभागृह पुणे येथे प्रदान करण्यात आले याप्रसंगी शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांच्या शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक , कला, आरोग्य, कृषी व पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी *जळगाव जिल्हा भूषण पुरस्कार* नुकताच प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे उज्जैनकर फाउंडेशनचे राज्य संपर्कप्रमुख तथा प्रसिद्ध साहित्यिक *डॉ.श्रीकांत पाटीलकोल्हापूर* यांना त्यांच्या शैक्षणिक, साहित्यिक कार्यासाठी कोल्हापूर जिल्हा साहित्य भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच उज्जैनकर फाउंडेशनचे बुलढाणा जिल्हा दक्षता समितीचे अध्यक्ष *शाहीर मनोहर पवार* यांना त्यांच्या शाहिरी कलेविषयीच्या कार्यासाठी *बुलढाणा जिल्हा कला पुरस्काराने* सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्रातील व गोवा राज्यातील असंख्य पुरस्कारार्थी या प्रसंगी उपस्थित होते पद्मश्री पोपटराव पवार आपल्या भाषणात म्हणाले की, पुरस्कार हे टॉनिक प्रमाणे आहे ते आपण नसते शोकेशमध्ये न ठेवता मनामध्ये ठेवून पुढील वाटचाल करावी कारण भविष्यात होणाऱ्या कार्यासाठी हे टॉनिक नक्कीच आपल्याला मदत करत असते. प्रसंगी ग्लोबल स्कॉलर फाउंडेशनचे संस्थापक चेअरमन डॉ. सुनील बेलगावे डॉ. प्रज्ञा पाटील श्री भाई पाटील आदि व्यासपीठावर उपस्थित होते या भव्य अशा पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाचे सुरेल सूत्रसंचालन श्री निशिकांत धुमाळ सर यांनी केले. याप्रसंगी फाउंडेशनचे खजिनदार सौ.संगीता उज्जैनकर आजीव सभासद चि. सचिन उज्जैनकर, चि. अरविंद उज्जैनकर, कु. धनश्री मुंधोकार, सचिन पाटील आदि सभागृहात उपस्थित होते.

उज्जैनकर फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉ शिवचरण उज्जैनकर,महाराष्ट्र संपर्क प्रमुख डॉ श्रीकांत पाटील कोल्हापूर,व बुलडाणा जील्हा दक्षता समितीचे अध्यक्ष यांचे महाराष्ट्र राज्य यांचे *मुख्य जन संपर्क प्रमुख मानवाधिकार आयोग,तथा बुलडाणा जिल्हा संपर्क प्रमुख फाऊंडेशन बुलडाणा प्राचार्य डॉ पंढरीनाथ शेळके, मानवाधिकार राज्य सयुक्त सचिव गजानन करे, शितल शेगोकार महिला समन्वयक* तथा फाऊंडेशन सर्व पदाधिकारी व बुलडाणा जिल्हा, जळगाव जिल्हा, गोवा राज्य पदाधिकारी सर्वांनी तीनही मान्यवरांना पुरस्कार मिळाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन केले.

Previous articleभारत की जान है,भारत की शान है,भीमजी तुम्हारा संविधान है” महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने भारतीय संविधान दिनी बहरला संविधान शाहिरी जलसा*
Next articleवाडेगाव- अकोला मुख्य रस्त्याचे काम रखडले.