Home Breaking News भारत की जान है,भारत की शान है,भीमजी तुम्हारा संविधान है” महाराष्ट्र शासन...

भारत की जान है,भारत की शान है,भीमजी तुम्हारा संविधान है” महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने भारतीय संविधान दिनी बहरला संविधान शाहिरी जलसा*

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नंबर – 8983319070

नाशिक (प्रतिनिधी)
महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.
” त्या भिम घटनाकाराने कार्य महान केले।
हे हक्क अधिकार तुम्हाला सारे दान केले।।
लाचार माणसाला सन्मानित केले।
रक्षण तुझे नी माझे कायद्याने केले।।

स्वातंत्र्य तुम्हा-आम्हा का,हे फुकाच मिळाले।
बलिदान कैक नारी-नराने,अर्पण देशास केले।। ” ह्या प्रा शरद शेजवळ यांच्या गझलला श्रोत्यांची दाद मिळाली.
येथील परशुराम सायखेडकर नाट्यगृहात विविध सांस्कृतिक व वैचारिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
भारतीय संविधानातील सार्वभौम, समाजवादी,धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य,नागरिकांना सामाजिक,आर्थिक,राजकीय न्याय,स्वातंत्र्य,समानता,बंधुता, वैज्ञानिक दृष्टीकोन तत्व विचार लोकमानसात रुजविण्याच्या हेतूने भारतीय संविधानाच्या सरनाम्याचे वाचन व विवेचन सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कटारे यांनी केले.
भारतीय संविधान शाहिरी कला अभियान तथा लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान कलापथक प्रा.शरद शेजवळ आंबेडकरी शाहिरी जलसा व शा. बाबुराव वाघमारे यांनी संविधान प्रचार,प्रसार व संवर्धन गीते सादर केली.
सादर करण्यात आलेले गीते

गीत गायक प्रा शरद शेजवळ यांनी
म्हणता कुण्या मुखाने भारत महान आहे।
डोके अजून येथे कित्येक गहाण आहे।
आहे जिवंत भारत यामुळेच की।
रक्षा भारता इथे बलवान संविधान आहे।
ह्या सह वामनदादा कर्डकांचे गझल गीते सादर केली.
हे माझ्या भारतीय बांधवांनों।
साथ संविधानाची सोडू नका।।

पाटी पुस्तक हाती घ्या गं।
लेकराला शिकवा संविधान गं।।

वंदन माणसाला,फुलेंनी जरका शिकवले नसते,भिम माझा लढे देत होता, समाजाच काय रे गड्या ही गीत सादर केली.
दीपक वाघ (बेंजो),दादा घाटे (ढोलकी) पंकज महाले (तबला) यांनी वाद्य साथ सांगत केली तर गायक दुशांत वाघ,दीपक साळवे,लक्ष्मण गाजभारे,सुभाष जाधव यांनी सहगायन केले.
शा. बाबुराव वाघमारे व संच भीम व संविधानगीतांचे सादरीकरण करताना “भारत की जान है,भारत की शान है,भीमजी तुम्हारा संविधान है” हे गीत सादर केली.
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव संयोजक सौरभ विजय (भा.प्र.से) व संचालक विभीषण चवरे,कार्यक्रम अधिकारी संदीप शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक कार्य संचालनालय संविधान दिन साजरा झाला.
सांस्कृतिक कार्य विभागाचे स्थानिक संयोजक राजेश जाधव, समन्वयक रवी साळवे,सह समन्वयक मीना वाघ यांनी परिश्रम घेतले
सौरभ विजय (भा.प्र.से)
सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन
विभीषण चवरे
संचालक
सांस्कृतिक कार्य विभाग
महाराष्ट्र शासन
राजेश जाधव
94222 47569
स्थानिक संयोजक,नाशिक विभाग

Previous articleपोलीस भरतीसाठी फॉर्म भरण्याची तारीख वाढविण्यात यावी – वंचित बहूजन युवा आघाडी.
Next article*डॉ.शिवचरण उज्जैनकर जळगाव* * *डॉ. श्रीकांत पाटील कोल्हापूर* *शाहीर मनोहर पवार ,बुलडाणा*