Home Breaking News *आयुष्य कसं जगावं*

*आयुष्य कसं जगावं*

जिल्हा संपादक नांदेड
साप्ताहिक भुमी राजा न्युज चॅनल नांदेड

आयुष्य म्हणजे खेळ नव्हे,
फुकट मिळालेला वेळ नव्हे,
आयुष्य एक कोडं आहे,
सोडवाल तितकं थोडं आहे,
म्हणुन म्हणतोय आयुष्यात
येऊन माणसं मिळवावी…!!
एक-मेकांची सुख दु:खे
एक-मेकांना कळवावी…!!!

बघायला गेलं तर
आयुष्यही खूप सोपं असतं…
जगायला गेलं तर
दु:खातही सुख असतं…
चालायला गेलं तर
निखारेही फूले होतात…
तोंड देता आले तर
संकट ही शुल्लक असतं…
वाटायला गेलं तर
अश्रूंत ही समाधान असतं…
पचवायला गेलं तर
अपयश ही सोपं असतं…
हसायला गेलं तर
रडणेही आपलं असतं…
बघायला गेलं तर
आयुष्यही खूप सोपं असतं…!!!!

आयुष्य म्हणजे
पत्यांचा खेळ.
चांगली पानं मिळणं
आपल्या हातात नसतं.
पण
मिळालेल्या पानांवर
चांगला डाव खेळणं,
यावर आपलं यश
अवलंबून असतं…!!!!

अश्रु नसते डोळ्यांमध्ये तर डोळे इतके
सुंदर असले नसते..!
दुःख नसते हृदयात तर
धडकत्या हृदयाला काही
किंमत उरली नसती..!
जर पुर्ण झाल्या असत्या
मनातील सर्व इच्छा तर
भगवंताची काहीच गरज
उरली नसती..!!!!

आयुष्य पण हे
एक रांगोळीच आहे.
ती किती ठिपक्यांची
काढायची हे नियतीच्या
हातात असले तरी
तिच्यात कोणते व कसे
रंग भरायचे हे आपल्या
हातात असते…..!!!!

आयुष्य खुप कमी आहे,
ते आनंदाने जगा..!
प्रेम् मधुर आहे,
त्याची चव चाखा..!
क्रोध घातक आहे,
त्याला गाडुन टाका..!
संकटे ही क्षण-भंगुर आहेत,
त्यांचा सामना करा..!
आठवणी या चिरंतन आहेत,
त्यांना हृदयात साठवून ठेवा….!!!!

कधी असेही जगून बघा
कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी
समोरच्याचा विचार करुन तर बघा!
तर कधी कोणाच्या हास्यासाठी, समाधानासाठी
न आवडलेल्या विनोदावरही हसुन तर बघा!
कधी असेही जगून बघा….!!!!

पंख नाहीत मला पण
उडण्याची स्वप्नं मात्र जरूर बघतो..
कमी असलं आयुष्य
तरी भरभरून जगतो..
जोडली नाहीत जास्त नाती
पण आहेत ती मनापासून जपतो…
आपल्या माणसांवर मात्र
मी स्वत:पेक्षा जास्त प्रेम करतो…..!!!!

आयुष्य थोडसंच असावं पण..
आपल्या माणसाला ओढ
लावणारं असावं,
आयुष्य थोडंच जगावं पण..
जन्मो-जन्मीचं प्रेम मिळावं,
प्रेम असं द्यावं की…
घेणार्‍याची ओंजळ अपुरी पडावी,
मैत्री अशी असावी की..
स्वार्थाचं ही भानं नसावं,
आयुष्य असं
जगावं की….
मृत्यूने ही म्हणावं,
“जग अजून,
मी येईन नंतर……….!!!!

Previous article२६ नोव्हेंबर संविधान दिन ते ६ डिसेंबर,डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन या कालावधीत समता पर्व साजरा होणार
Next articleशेगाव येथील123 क्रमांक अंगणवाडी केंन्द्र भिमनगर,येथे संविधान दिवस साजरा.