Home Breaking News दोन वेचणीतच कापसाच्या झाल्या प-हाटया!

दोन वेचणीतच कापसाच्या झाल्या प-हाटया!

👉 शेतकऱ्यांवर अस्मानी संकट..

जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 25 नोव्हेंबर 2022

यावर्षीचा खरीप हंगाम शेतकऱ्यांना आठवणीतच राहणार आहे. कारण प्रचंड अतिवृष्टीने पिकांच्या उत्पादनात कमालीची घट दिसून येत आहे. जास्त पाऊस पडल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, कापुस, मुग, उडीद पिकांचे नुकसान झाले. सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदतही दिली. परंतु शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणुन ओळख असलेले आणि नगदी पिक म्हणुन शेतकरी कापस या पिकाची लागवड दरवर्षी करतो. परंतु यावर्षी अतिवृष्टीमुळे कपाशी या पिकाच्या दोन वेचणीतच प-हाटया झाल्या आहेत. कपाशी या पिकाची पाने लाल पडली आहेत. धुवारीने उभा असलेला कापुस वाळुन जात असल्याचे चित्र दिसत आहे.
यावर्षी कापसाला 8900 ते 9200 प्रतिक्विंटल दर असल्याने, शेतकऱ्यांना कापुस परवडत आहे. असे जाणकार शेतकरी आवर्जून सांगत आहेत. आर्थिक दृष्ट्या कापुस हे पिक परवडत असले तरी यावर्षी उत्पादनात कमालीची घट दिसून येते आहे.

Previous articleकृषीथॉन प्रदर्शनाचे नाशिक मध्ये भव्य आयोजन
Next article२६ नोव्हेंबर संविधान दिन ते ६ डिसेंबर,डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन या कालावधीत समता पर्व साजरा होणार