Home Breaking News हिंदी प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सिडको नाशिक क्रातिवीर वसंतराव नारायणराव नाईक...

हिंदी प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सिडको नाशिक क्रातिवीर वसंतराव नारायणराव नाईक यांची जयंती उत्सहात साजरी

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़
मो. नंबर – 8983319070

के व्हि एन नाईक शिक्षण संस्थेच्या सिडको शैक्षणिक संकुलात हिंदी प्राथमिक/माध्यमिक विद्यालयात क्रा वसंतराव नारायणराव नाईक यांची जयंती उत्सव समारोह आज सोमवार दि 21/11/2022 रोजी सकाळी 9 वा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सदर कार्यक्रम संस्थेचे विश्वस्त भाष्करराव नाना सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक  मंगेशभाऊ नागरे नगरसेविका  किरणताई गामणे-दराडे,नगरसेवक  साहेबराव आव्हाड प्रकाश चकोर,  दिलीपराव सोनवणे, अशोक सांगळे, गोविंद आव्हाड, अरुण जायभावे, बाळासाहेब आव्हाड,हिंदी प्राथमिक मुख्याध्यापिका श्रीमती सुनंदा थोरे मॅडम आदी उपस्थित होते, तसेच मोरवाडी आणि सिडको परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, विविध संस्थाचे पदाधिकारी आदि उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य  प्रदिप सांगळे सर यांनी केले.उपस्थित सर्व मान्यवरांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी क्रातीवीरांच्या जीवनावर विद्यालयाच्या विद्यार्थी कु रोशनी सिंह,कु श्रद्धा तिवारी,कु प्रिया सिंह,कु प्रणिता चंद्रवंशी,क्षितिज मौर्य या विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केले
तसेच विद्यालयाच्या वतीने शिक्षिका श्रीमती रेखा धात्रक प्रमुख पाहुण्यांच्या वतीने श्री अरुण जायभावे सर  प्रकाश चकोर यांनी आपले विचार व्यक्त केले
शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष भास्करराव सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धा मध्ये प्रथम/द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन  के. पी. कापडी सर यांनी केले तर आभार उमेश भाबड सर यांनी व्यक्त केले
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व प्राथमिक/माध्यमिक शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले

Previous articleमूर्तिजापूर | पीकविमा कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या ६ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल…
Next articleस्वर्गरथाचा पाटा तुटल्याने भिषण अपघात. 👉 ५ जन गंभीर ७ जन किरकोळ जखमी