Home Breaking News मूर्तिजापूर | पीकविमा कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या ६ कार्यकर्त्यांवर गुन्हे...

मूर्तिजापूर | पीकविमा कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या ६ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल…

योगेश घायवट

मूर्तिजापूर शहरातील आयसीआयसीआय लेम्बोर्ड पिक विमा कार्यालयाची काल उद्धव ठाकरे शिवसेनेच्या काही कार्यकत्यांनी तोडफोड केली होती तर आता या प्रकरणी शिवसेनेच्या ६ कार्यकर्त्यांवर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मूर्तिजापूरात तालुक्यातील पावसामुळे शेतकऱ्यांची हजारो हेक्टर जमिनीचे पिक नष्ट झाले तरी मात्र पीक विमा मदत व महात्मा ज्योतीबा फुले प्रोत्साहन योजनेचे अनुदान मिळाले नसल्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी पिका विमा कार्यालयात जाऊन तोडफोड केली होती. यावेळी अप्पू तिडके यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयातील असलेल्या खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली होती.
प्राप्त माहितीनुसार शासनातर्फे ए एस आय आशिष यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अप्पु उर्फ मोहित तिडके समवेत आणखी ५ ते ६ कार्यकर्ते यांनी सोमवार २१ नोव्हेंबर रोजी दुपारी १ ते १:३० च्या दरम्यान बेकायदेशीर जमाव जमवुन आयसीआयसीआय लेम्बोड पिक विमा कार्यालयातील खुर्च्यांची तोडफोड केली जिल्हाधिकारी यांच्या ३७ (१×३) चे उल्लंघन केले असल्याच्या फिर्यादीवरून अप्पू उर्फ मोहित तिडके समावेत पाच ते सहा आणखी कार्यकर्त्यांविरुद्ध कलम १४३,१४९,४४७,४२७,भादवी सहकलम १३५ मुंबई पोलीस कायद्यान्वये शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून पुढील तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक दीक्षित करीत आहेत.


काल मूर्तिजापूरात संतप्त शिवसैनिकांनी रास्ता रोको नंतर थेट पीकविमा कार्यालय गाठत कार्यालयाची तोडफोड केलीय..शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित पैसे जमा न झाल्यास आणखी उग्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही यावेळी शिवसैनिकांनी दिला होता

Previous articleशेतकऱ्यांनी निराश न होता. बुद्धीला चालना देऊन शेती करावी..
Next articleहिंदी प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सिडको नाशिक क्रातिवीर वसंतराव नारायणराव नाईक यांची जयंती उत्सहात साजरी