Home Breaking News भारतीय जनता पार्टी उत्तर महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचा मेळावा निफाड़ येथे उत्साहात...

भारतीय जनता पार्टी उत्तर महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचा मेळावा निफाड़ येथे उत्साहात संपन्न

मेळावाचे आयोजक युवराज मोहिते यांची भारतीय जनता पक्षाच्या भटके विमुक्त आघाडीच्या प्रदेश सरचिटनिस पदी निवड

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नंबर – 8983319070

पारतंत्र्यापासून कपाळावर गुन्हेगारीचा शिक्का बसला तो आजवरही अनेक भटक्या समजावर आहे पोटभरण्यासाठी आयुष्यभर भटकंती करायची त्यामुळे ना शिक्षण,ना नोकरी, ना कायमस्वरूपी राहण्याचे ठिकाण असे हळखीचे जीवन जगणाऱ्या भटक्या समाजाला, जगण्याचा हक्क मिळावा त्यांना शासनाच्या विविध योजनाचा लाभ मिळावा त्यांच्यात जागरूकता निर्माण व्हावी यासाठी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या उत्तर महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. निफाड येथील रुद्राय हॉटेलच्या सभागृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमांस प्रमुख पाहुणे म्हणून भारतीये जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश महामंत्री गोविंद राव गुंजाळकर, प्रदेश महामंत्री राजू भाऊ संळूंके,प्राध्यापक संजीव कुमार जाधव, बापू दादा शिंदे, नवनाथ ढगे, बबनराव सानप, प्रभाकर केदार, एकनाथ चव्हाण, पुंडलिक मोहिते, रवी पवार, अजय चव्हाण, संजय चव्हाण, आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.त्यानंतर कार्यक्रमाचे आयोजक युवराज मोहिते यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला भटक्या समाज बांधवाना चांगले जीवन जगता यावे, शिक्षण घेता यावे, शिक्षण, नोकरी, कायम स्वरूपी घर, रेशन कार्ड,जातीचा दाखला, आदी सुविधा मिळाल्या पाहिजेत त्यासाठी महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीच्या वतीने शासनाकडे दाद मागितली असून केंद्र आणि राज्यातील सरकारने विविध योजना सुरु केल्या असून त्याची माहिती यावेळी मान्यवरांकडून देण्यात आली. यावेळी (bite)कार्यक्रमाचे आयोजक युवराज मोहिते यांची भारतीय जनता पक्षाचे भटके विमुक्त आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली. या निवडी मुळे उपस्थित मान्यवरांकडून युवराज मोहिते, यांच्या वर शुभेच्छांचा वर्षाव केला. सदर मेळाव्यास समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleविवाहित प्रेमीयुगुलांची गळफास लावून आत्महत्या
Next articleराज्य नाट्य स्पर्धा : नाशिक उद्घघाटन समारंभ उत्सवात संपन्न