Home Breaking News विवाहित प्रेमीयुगुलांची गळफास लावून आत्महत्या

विवाहित प्रेमीयुगुलांची गळफास लावून आत्महत्या

खामगावात आदर्श लॉज मधील धक्कादायक प्रकार

खामगाव:-(अजयसिंह राजपूत) आज सकाळी कॉटन मार्केट समोरील आदर्श लॉज मध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या घटनेने शहरात खळबळ उडाली.आत्महत्या करण्यापूर्वी युवकाने त्याच्या भावाला व्हिडिओ कॉल करून शेवटचे बघून घे सांगत गळफास लावून आत्महत्या केली. युवक विकास पंजाबराव सावळे वय (२७) रा. कळंबी ता. बाळापूर ह.मु.इंदोर हा सकाळी ६ वाजेदरम्यान त्याची प्रेयसी सौ. शितल सुनील नितोने वर (२५) हिला घेऊन आदर्श लॉजवर आला. शितल त्याची पत्नी असल्याचे सांगितले व रूम केली. थोड्यावेळाने भावाला व्हिडिओ कॉल करून शेवटचे बघून घे आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. आणि गळफास लावून दोघांनी आत्महत्या केली. विकासचा भाऊ लॉज वर आल्यावर लॉजच्या रूमचा दरवाजा तोडून पाहिले असता हि घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले. आत्महत्येचे नेमके कारण काय अद्यापही कळू शकले नाही.पुढिल तपास पोलीस करत आहे.

Previous articleनिंभोरा बु/ येथील मनोज ओवे यांच्या कुटुंबीयांचे वंचितच्या वतीने सात्वन
Next articleभारतीय जनता पार्टी उत्तर महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचा मेळावा निफाड़ येथे उत्साहात संपन्न