👉 नाल्यावर पुल बांधुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा
जिल्हा संपादक नांदेड दिनांक – 17 नोंहेबर 2022
समृद्ध शेती विकासाला चालना देण्यासाठी मातोश्री पांदण रस्ते योजने अंतर्गत शेतकऱ्यांना रस्ता मिळणे, गरजेचे आहे. आणि त्या पांदन रस्तावर एखाद्या नाला असल्यास पुल बांधुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. अशी सवना ज. येथील शेतकरी बांधवांनी केली आहे. अक्ष:रक्षा पावसाळ्यात गुडघाभर चिखलातून शेतकऱ्यांना शेताकडे जावे लागते. हि वस्तुस्थिती सवना येथील शेतकरी बांधवांची आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष झाले. पण शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी रस्ता नाही. नुकताच अमृतमहोत्सव कृषिप्रधान देशाने सर्वत्र थाटात साजरा केला. पण शेतकऱ्यांना शेती कसण्यासाठी रस्ता नसेल, तर हा अन्नदाता शेतकरी कशी आधुनिक शेती करेल, हा ज्वलंत प्रश्न आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवनवीन सुधारीत बियाण्याचा वापर केल्यास उत्पादनात वाढ होते. हेही त्रीकालाबाधीत सत्य आहे. पण सवना येथील पुरुष, महिला शेतकरी भगिनींना या चिखलातून वाट काढतांना कसरत करावी लागते.
म्हणुन लोकप्रतिनिधींनी त्वरित पुल मंजुर करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. अशी मागणी सवना येथील शेतकरी बांधवांनी केली आहे.