Home Breaking News संभापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वयेचा फलक लावण्यात यावा:-अजयसिंह...

संभापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वयेचा फलक लावण्यात यावा:-अजयसिंह राजपूत

खामगाव प्रतिनिधी

सात दिवसाच्या आत फलक लावण्याचा इशारा

संभापूर:-सर्वसामान्य माणसाला, त्यांच्या हक्कांची, कर्तव्यांची आणि अधिकारांची जाणीव करून द्यावी लागेल.
आणि हे काम समाजातील प्रत्येक जागरूक नागरिकाचे आहे. ते त्याने निस्वार्थपणे पार पाडावे.संभापुर येथील ग्रामपंचायत मध्ये माहिती अधिकार अधिनियम २००५ अन्वयेचा फलक लावण्याबाबत निवेदन देण्यात आले. राज्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या बाहेर असे फलक झळकणे आवश्यक आहे.उपरोक्त संदर्भीय विषयान्वे माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये आपल्या ग्रामपंचायत कार्यालय मध्ये दर्शनीय भागात जनमाहिती अधिकारी यांचे नांव, हुद्दा, संपर्क क्रमांक (दुरध्वनी क्रमांक), ईमेल आयडी आणि प्रथम अपिलीय अधिकारी यांचे नांव, हुद्दा, संपर्क क्रमांक (दुरध्वनी क्रमांक), ईमेल आयडी, द्वितीय अपिलीय अधिकारी यांचे नांव, हुद्दा, संपर्क क्रमांक (दुरध्वनी क्रमांक), ईमेल आयडी असा फलक लावलेला दिसत नाही.हा फलक लावणे सर्व शासकीय कार्यालयांना बंधनकारक आहे.तो लावला नसल्यामुळे माहितीचा अधिकार अधिनीयम २००५ च्या कलम २८ चा भंग होत आहे.तरीही अधिनियमाचा भंग होऊ नये म्हणून ग्रामपंचायत नी सदरचा फलक तयार करून कार्यालयाच्या दर्शनीय भागावर लावण्यात यावा.व आम्हाला लावलेल्या फलकांचा फोटो या ajaysingrajput323@gmail.com मेल आयडी वर अवगत करावे.जर सात दिवसांत ग्रामपंचायत कार्यालय संभापूर मध्ये दर्शनीय भागात फलक लावलेला दिसला नाही तर तशी तक्रार या विनंती पत्राची प्रत जोडून मा.गटविकास अधिकारी साहेब पंचायत समिती खामगाव यांच्याकडे सादर करण्यात येईल,असे अजयसिंह राजपूत यांनी निवेदनात म्हटले आहे.

Previous articleस्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाच्या घोषणेने नाशकात दिव्यांगांचा जल्लोष ! . .
Next articleमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली प्रकाश आंबेडकर यांची भेट