योगेश घायवट भूमिराजा प्रतिनिधी बाळापुर
10/11/2022 ला मांजरी गावकरी मंडळी आणि आम्ही ग्राम पंचायत सदस्य सर्वांनी मिळून निवेदन दिले होते.त्यांनतर आज स्वतः जिल्हापरिषद उपाध्यक्ष माननीय सुनील भाऊ फाटकर तसेच जिल्हा परिषद सदस्य माननीय राम गव्हाणकर यांनी भेट दिली.तसेच पुलाची पाहणी करून पूर्ण काम पूर्णपणे चांगल्या प्रतीचे होईल.असे गावकऱ्यांना आश्वासन दिले.त्यानंतर लोकांच्या समोर ठेकेदार तसेच इंजिनिअर यांना कॉल केला. व त्यांना पण सांगितले की या पुलाकडे माझे विशेष लक्ष आहे.असे सुनील फाटकर यांनी अधिकाऱ्यांना बजावुन सांगितले.त्यांबद्दल सर्व गावकऱ्यांच्या वतीने तसेच ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच,सदस्य आभार व्यक्त केले.गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी हजर होते.