Home Breaking News ओझोन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अकोला येथे ओझोन  वाचनालयाचे उदघाटन

ओझोन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अकोला येथे ओझोन  वाचनालयाचे उदघाटन

योगेश घायवट अकोला प्रतिनिधी

पश्चिम विदर्भातील पहिला प्रयोग(स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन चा शिक्षणासाठी,
समाजकल्यानासाठी अभिनव उपक्रम)

आज दि.१० नोव्हेंबर २०२२(वार:-गुरूवार) रोजी स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन मार्फत ओझोन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,अकोला येथे *ओझोन वाचनालय* चे उदघाटन करण्यात आले.स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन ने ओझोन हॉस्पिटल मध्ये *ओझोन वाचनालय* स्थापन केले, हे पश्चिम विदर्भातील पहिले उदाहरण आहे,हा अभिनव प्रयोग आहे :- रणधीरभाऊ सावरकर(आमदार:-पूर्व अकोला).
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.डॉ.रणजित सपकाळ (संचालक :- महाबीज),उदघाटक म्हणून मा.श्री.रणधीरजी सावरकर(आमदार:-पूर्व अकोला),प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.राजेश पाटिल ताले(अध्यक्ष :- स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन),प्रमुख अतिथी म्हणून मा.श्री.देवराजजी सातपुतळे,प्रा.गोपाल वांडे(संचालक :- घे भरारी स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन केंद्र, वाशिम),कार्यक्रमाचे निमंत्रक मा.डॉ.विनीत हिंगणक(संचालक:- ओझोन हॉस्पिटल) हे उपस्थित होते.ओझोन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे पूर्ण विदर्भातील नामवंत हॉस्पिटल आहे.या हॉस्पिटल मध्ये पश्चिम विदर्भातील ५ जिल्ह्यांमधून रुग्ण येतात, ज्यांचे नातेवाईक ओझोन मध्ये भरती राहतात त्या लोकांना जवळपास १०-१२ दिवस ओझोन मध्ये भरती राहावं लागते या रुग्णांच्या नातेवाईकांना प्रेरणा देण्यासाठी,विरंगुळा म्हणून

*ओझोन वाचनालयाचा* अनोखा प्रयोग स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन च्या माध्यमातून करण्यात आला या वाचनालयाचा फायदा रुग्णांच्या नातेवाईकांना होईल असे स्वामी विवेकानंद ग्रुप चे अध्यक्ष राजेश पाटिल ताले यांनी सांगितले.स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन गेल्या ८ वर्षांपासून अकोला जिल्ह्याच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्य करीत आहे.वाचन चळवळ च्या माध्यमातून वाचन संस्कृती जोपासण्यासाठी स्वामी विवेकानंद ग्रुपने जिल्हाभर जवळपास ६० च्यावर वाचनालय व ६०००० च्या वर पुस्तके विद्यार्थ्यांना वितरित केली आहेत.वाचन संस्कृती रुजविण्यासाठी ओझोन हॉस्पिटलमध्ये ओझोन वाचनालय स्थापण करून ग्रुपने हा अभिनव प्रयोग केला असल्याचे प्रतिपादन ओझोन चे संचालक डॉ.विनीत हिंगणकर यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजुभाऊ ओळंबे, प्रतीक ताले,भूषण ताले, राहुल ताले,शिवम घोगरे, उध्दव भाकरे,ज्ञानेश्वर वानखडे,विकास भाकरे,सागर गावंडे,शिवम घोगरे,गोपाल भाकरे,मयूर ताले यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ विनीत हिंगणकर,आभारप्रदर्शन प्रतीक ताले तर सुत्रसंचालन आदित्य टोळे यांनी केले.

Previous articleहिंगणा येथील अंगणवाडीचे बांधकाम अर्धवट अवस्थेत…!!
Next articleराज्य नाट्य स्पर्धात नाशिक विभागात रंगणार 29 नाटके