Home Breaking News *शितल शेगोकार यांची आंतराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेच्या अमरावती विभाग सचिव पदी...

*शितल शेगोकार यांची आंतराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेच्या अमरावती विभाग सचिव पदी निवड*

अँकर ,शितल शेगोकार प्रतिनिधी शेगाव भूमीराजा न्यूज

कवयित्री , लेखिका, निवेदिका सामाजिक कार्यकर्त्या शितल शेगोकार यांची आंतराष्ट्रीय पातळीवर पर्यावरण संरक्षण तसेच सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेच्या अमरावती विभाग सचिव पदी निवड करण्यात आली आहे. शितल शेगोकार या अनेक साहित्य संस्थेत कार्यरत असून त्यासोबतच त्या गरजूंना मदत, पर्यावरण संरक्षण साठी वृक्षारोपण, वृक्षसंवर्धनाचे उल्लेखनीय कार्य गेल्या कित्येक वर्षांपासून करीत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन यापूर्वी त्यांची आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेच्या शाखा बुलढाणा जिल्हा महिला अध्यक्षा पदावर निवड करण्यात आली होती. त्यांनी निवडी पासून केलेल्या उल्लेखनीय पर्यावरण संरक्षण तसेच सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची अमरावती विभाग महिला सचिव या पदावर पदोन्नती करण्यात आली असल्याचे आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्री.देवा तांबे यांनी सांगितले. शितल शेगोकार यांना विविध राज्यस्तरीय सामाजिक, पर्यावरणीय पुरस्कार मिळालेले असून सामाजिक,साहित्य चळवळीत सक्रिय असलेले व्यक्तिमत्व, काव्यरत्न,पर्यावरण मित्र अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सम्मानित करण्यात आलेले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन संस्थेची महाराष्ट्र राज्य निवड समिती , राष्ट्रीय निवड समिती,तसेच आंतरराष्ट्रीय निवड समितीच्या बैठकीतून त्यांची जाहीर निवड करण्यात आली आहे.


त्यांच्या निवडीबद्दल संस्थेचे संस्थापक आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्री.देवा तांबे , आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष सुहासिनी म्हाळस्कर (अमेरिका) , सचिव श्री.दीपक काळे, सौरभ हजारे तसेच संस्थेचे पदाधिकारी व सदस्य सह बुलढाणा जिल्हा व अमरावती विभागातील पर्यावरण प्रेमी ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक केले . वृक्ष रोपण, वृक्ष संवर्धन, प्लास्टिक मुक्त भारत, जनजागृती, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सेंद्रिय विषमुक्त शेती, संप्रदाय, मूल्यशिक्षण, प्रदूषण नियंत्रण, युवा पिढी मार्गदर्शन अशा अनेक चळवळी हाती घेणारी आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था आज भारता बाहेर अनेक देशांमध्ये कार्यरत आहे.

Previous articleकच्चे पांदण रस्ते, पक्के बनवा! 👉 शेतकऱ्यांची मागणी
Next article“पु. ल. देशपांडे “यांच्या स्मृतीनिमित्त वर्षभर ग्लोबल पुलोत्सव साजरा होणार