Home Breaking News रब्बी हंगामातील पेरणीस आला वेग…

रब्बी हंगामातील पेरणीस आला वेग…

👉 गुलाबी थंडीची चाहुल जाणवु लागली.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 06 नोव्हेंबर 2022

यावर्षी प्रचंड अतिवृष्टीने कहर केला. खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले. शिंदे-फडणवीस हेक्टरी 13600 रुपये सरकारने शेतकऱ्यांना अनुदान दिले.
पावसाळा जास्त असल्याने विहिर, बोअर तुडुंब भरून आहेत. म्हणुन यावर्षी रब्बी हंगामातील पिकांचा पेरा वाढला असून, गहु, हरभरा पेरण्यासाठी शेतकऱ्यांची लगभघ दिसुन येत आहे. तसेच हळुहळु गुलाबी थंडीची चाहूल लागत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, नवनवीन सुधारीत बियाण्याचा वापर करण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. ट्रॅक्टरचा वापर वाढला असून, लंपी आजाराने, चा-यांचा प्रश्न आणि पशुधन बाळगण्यास माणसं नसल्याने, त्यामुळे जनावरे बाळगण्यास शेतकरी धजावत नाही.
एकंदरीत यावर्षी रब्बी हंगामातील पिकांचा पेरा वाढला असून, भविष्यात उत्पादन चांगले मिळावे. याच आशेवर बळीराजा रब्बी हंगामात काळया आईची ओटी भरण्यास सज्ज झाला आहे. असेच काहीसे चित्र निर्माण झाले आहे.

Previous articleप्राथमिक आरोग्य केंद्र चिंचोरडी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लेवाड मॅडम यांचा सत्कार संपन्न.
Next articleकच्चे पांदण रस्ते, पक्के बनवा! 👉 शेतकऱ्यांची मागणी