हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नंबर.- 8983319070
*मा.विभागीय आयुक्त अंतर्गत, मा.प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण विभाग नाशिक, यांच्या कार्यालयात धनगर सामाजाच्या २२ योजना अंतर्गत सुरु असलेल्या १३ योजना संर्दभात बैठक संपन्न*
राज्य सरकारने सांगितल्याप्रमाणे जे जे आदिवासींना ते ते धनगरांना. राज्य सरकारने 1000 कोटीच्या योजना कार्यान्वित केल्या परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्या सर्व गोष्टी धनगर समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिक विभागीय उपायुक्तांकडे मांडले. निवासी व नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळेत धनगर विद्यार्थ्यांना प्रवेश, वस्तीगृहात धनगर विद्यार्थ्यांना प्रवेश, धनगर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना तसेच बेघर धनगर कुटुंबांना मोफत (आवास) घरकुल योजना अशा एक ना अनेक योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली पाहिजे अशा पध्दतीने बैठकीत खालील विषयावर चर्चा झाली. जळगाव, मालेगाव येथील असलेली निवासी इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत मुलाना प्रवेश देताना मेंढपाळच्या मुलांना प्राधान्य देणे, मेंढपाळ बांधवाच्या मुलांना अन्य वस्तिगृहात प्राधान्याने प्रवेश पारर्दशक पद्दतीने प्रवेश देणे उदा. नामांकित पेपरात जाहिरात देणे, आॕनलाईन प्रवेश देणे, शालेय प्रवेश पध्दतीने कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेणे, महाराष्ट्र शासनाने , दि.१७/८/२०२२ रोजी १३ योजना लागू करण्यासाठी काढलेल्या GR ची त्वरित काटेकोर पणे अंमलबजावणी करावी, *१००० कोटी रुपये त्वरीत योजनेवर खर्ची करावेत.
*१०००० घरकुल योजनेची लाभार्थी संख्या दुप्पट करुन प्रभावीपणे राबवणे,
धनगर विद्यार्थी शाळा प्रवेश क्षमता ११००० करण्यात यावी,
प्रत्येक विभागातील वस्तीगृहाला शासनाने मान्यता दिलेली असुन त्या नाशिक विभागाप्रमाणे सर्व विभागात प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात यावी.
विभागीय नाशिक येथील वस्तीगृहा विषयी आराखडा शासनाला पाठवला आहे, ते आल्यावर त्वरीत कार्यवाही होईल, सध्या सिन्नर,जळगाव चाळिसगाव, मालेगाव यांच्या प्रमाणे
धुळे, नदुरबार या ठिकाणी ही निवासी इंग्रजी शाळा सुरु करण्यात यावेत,या विषयांवर प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण अधिकारी देविदास कोकाटे साहेब व जनसंपर्क अधिकारी शशिकांत पाटील साहेब यांच्याशी धनगर समाजाच्या शिष्टमंडळातील उत्तर महाराष्ट्रातील समाजाचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर परदेशी, डी ए धनगर, नवनाथ ढगे, सचिन मार्कंड, संगिता पाटील, संजीव दुकळे, नवनाथ शिंदे, हेमंत शिंदे, रमेश पवार, मनोहर परदेशी, योगेश धनगर व इतर पदाधिकारी यांनी सविस्तर चर्चा केली. यावेळी विभागीय कार्यालयातील सर्व अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच कार्यालयाकडून धनगर समाजाला असलेल्या अपेक्षांची पूर्तता पुढील काळामध्ये निश्चित होईल, पुढील बैठक लवकरच होईल असे आश्वासित केले.