Home Breaking News सवनेकरांचे ….लोणे, व भडंगे, यांच्या कामगीरी बाबत गावकऱ्यांनी काढले गौरव् उद्गार

सवनेकरांचे ….लोणे, व भडंगे, यांच्या कामगीरी बाबत गावकऱ्यांनी काढले गौरव् उद्गार

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 01 नोव्हेंबर 2022

हिमायतनगर तालुक्यातील मौजे सवना हे निजामशाही काळातील चळवळीत गांव म्हणुन तालुक्यात बहुचर्चित आहे. गावचा पुर्वज कालीन इतिहासही तसा छान…. आहे.
निजामकाळातील आजही डौलत, थाटात, डोलदार ती ईमारत (ठाण) आजतागायत डोलत उभी आहे.
गावातील हनुमान मंदिर देवस्थान डिपीचा प्रश्न सोडविण्यासाठी अपार कष्ट करुन संरपंच परमेश्वर गोपतवाड यांनी प्रयत्नची पराकाष्ठा करत गावचे प्रथम नागरिक म्हणून सतत सेवा देत आहेत. पण नियतीच्या मनात वेगळेच काहीतरी होते.
ऐन दिवाळीत फटाके फोटतांना लाईटचा आनंद, दिव्यांचा दिव्य लुखलुखणा-या प्रकाशाचा आनंद लुटतांना सवनेकरांचे स्वप्न धुळीस मिळाले.
नानाविध संरपंचाने खटाटोप केला. पण… शेवटी महावितरणच्या वरीष्ठ अधिकारी यांना सरपंच परमेश्वर गोपतवाड यांनी पत्र व्यवहार करत यश मिळविले आहे.
महावितरणच्या राम- लक्ष्मणाची जोडीने सवनेकराची अंधारातुन सुटका केली. ती आदरणीय सहाय्यक अभियंता लोणे साहेब आणि भडंगे साहेब व त्यांचे सर्व कर्मचारी, सहकारी बंधुनी….
सर्वांचा सवना ग्रामपंचायत आणि सवनेकराच्या वतिने पुष्पहार, शाल, श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी सवना ज ग्रामपंचायत चे सरपंच, चेअरमन, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष परमेश्वर गोपतवाड, उपसरपंच प्रतिनिधी सोनबाजी राऊत, मा. संरपंच सिद्धार्थ राऊत, गजानन गोपेवाड, लक्ष्मण गायकवाड, मुरली अनगुलवार, पुरी साहेब, चव्हाण, दिवटेवाड, यांच्यासहित सर्व सवना नगरीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleहिमायतनगर शहरातील पेट्रोल पंपावर पेट्रोलची टंचाई!
Next article*उत्तर महाराष्ट्र धनगर समाज शिष्टमंडळाने समाज कल्याण विभागीय उपआयुक्तांकडे मांडला समस्यांचा पाढा*