Home Breaking News हिमायतनगर तालुका परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी ई- पीक नोंदणी करून घ्यावी – तहसीलदार...

हिमायतनगर तालुका परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी ई- पीक नोंदणी करून घ्यावी – तहसीलदार डी.एन. गायकवाड

भूमीराजा न्यूज प्रतिनीधी रविकुमार पवार खडकीकर मो. 7350333415

हिमायतनगर | तालुका परिसरातील शेतकऱ्यांनी केवळ ६० टक्के ई -पीक नोंदणी केलेली आहे. अजून १५ हजार हेक्टर वरील पीक नोंदणी ऑनलाइन करणे शिल्लक आहे. शासकीय अनुदानासाठी आणि पीकविमा मिळविण्यासाठी ईपीक नोंदणी आवश्यक आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही ई पीक नोंदणी केली नाही त्यांनी करून घ्यावी असे आवाहन हिमायतनगरचे तहसीलदार गायकवाड यांनी केले आहे.

हिमायतनगर तालुक्यातील शेतीतील शिल्लक क्षेत्र व खातेदार यांची ऑनलाईन ई पीक नोंदणी करणे बाबत शेतकऱ्यांना तहसीलदार गायकवाड यांनी आवाहन करताना सांगितले की, तालुक्यातील ई पीक पाहणी केवळ ६०% झाली असुन, अदयाप १५ हजार हेक्टर क्षेत्राची ई पीक नोंदणी करणे बाकी आहे. पीक विमा व ईतर शासकीय अनुदानसाठी ई पीक नोंदणी महत्वाची आहे. त्यासाठी सर्व शेतकरी बांधवानी ई पीक नोंदणी पूर्ण करून घेणे आवश्यक आहे.

आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व प्रगतीशील शेतकरी, सरपंच, उपसरपंच, चेअरमन, पोलिस पाटील, रास्त भाव दुकानदार, विद्यार्थी, कोतवाल यांचे मदतीने स्वंयसेवक गट तयार करुन पीक नोंदणी करिता सर्वानी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत. एका मोबाईलवर १०० खातेदार यांची नोंदणी करता येते.

प्रत्येक गावात किमान १० ते १५ volunteer ई पीक नोंदणी करिता नेमावेत अश्या सूचना त्यांनी तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवक या सर्वांना केल्या आहेत.

Previous articleअ. भा. मराठी नाट्यपरिषदेच्या नाशिक शाखेचे राज्यस्तरीय पुरस्कार रंगकर्मीना जाहीर
Next articleहिमायतनगर शहरातील पेट्रोल पंपावर पेट्रोलची टंचाई!