Home Breaking News अ. भा. मराठी नाट्यपरिषदेच्या नाशिक शाखेचे राज्यस्तरीय पुरस्कार रंगकर्मीना जाहीर

अ. भा. मराठी नाट्यपरिषदेच्या नाशिक शाखेचे राज्यस्तरीय पुरस्कार रंगकर्मीना जाहीर

5 नोव्हेंबर रंगभूमी दिनी पुरस्कार वितरण

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नंबर – 8983319070

अ. भा. मराठी नाट्य परिषद, नाशिक शाखेच्या वतीने दरवर्षी रंगभूमी दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा नाट्यपरिषदेच्या कालिदास कलामंदिर येथील कार्यालयात परिषदेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. यावेळी जेष्ठ अभिनेत्री अनुराधा यांना अभिनय आणि जेष्ठ दिग्दर्शक सतीश कोठेकर यांना दिग्दर्शनाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
अ. भा. मराठी नाट्य परिषद. नाशिक शाखेच्या वतीने दरवर्षी अभिनय, दिग्दर्शन, लेखन, बालरंगभूमी, सांस्कृतिक पत्रकारिता, लोककला, लोकशाहिरी, सांस्कृतिक कार्यकर्ता, संगीत आणि विशेष योगदान असे 11 पुरस्कार देण्यात येतात. नाट्य परिषदेच्या कार्यालयात अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, उपाध्यक्ष नगरसेवक शाहू खैरे, प्रमुख सचिव सुनिल ढगे, ईश्वर जगताप आणि पदाधिका-यानी हे पुरस्कार जाहीर केले.

Previous articleहिमायतनगर तालुका परीसरातील बळीराजाच्या रब्बी हंगामासाठी नांगरणी,वखरणीच्या कामाला आला वेग……
Next articleहिमायतनगर तालुका परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी ई- पीक नोंदणी करून घ्यावी – तहसीलदार डी.एन. गायकवाड