Home Breaking News हिमायतनगर तालुका परीसरातील बळीराजाच्या रब्बी हंगामासाठी नांगरणी,वखरणीच्या कामाला आला वेग……

हिमायतनगर तालुका परीसरातील बळीराजाच्या रब्बी हंगामासाठी नांगरणी,वखरणीच्या कामाला आला वेग……

भूमीराजा न्यूज प्रतिनीधी रविकुमार पवार खडकीकर मो. 7350333415

दि.३०/१०/२०२२
हिमायतनगर /-
यावर्षी सर्वांनाच त्रस्त करुन सोडणारा ‘पावसाळा आता संपला असून मान्सुने माघार घेतल्याचे हवामान खात्याने जाहीर केले. त्यातच दिवाळीपासून गुलाबी थंडीला सुरुवात झाली. सकाळच्यावेळी धुक्याची शाल निसर्गाने पांगरल्याचे दिसून येत आहे. बळीराजानेही मोठे आर्थिक संकट झेलत सोयाबीन काढून घेतले. आता लगबग सुरु झाली रब्बी हंगामाच्या पिकाची..पेरणी करण्यासाठी नांगरणी, वखरणीला आता वेग आला आहे.

यावर्षी अतिवृष्टीने उडीद, मुग व सोयाबीन हातचे गेले. मुसळधार पावसामुळे जमीन खरडून गेली. पिके वाहत गेली तरीही शेतकऱ्यांनी हिंमत न हारता उरली सुरली पिके जगविण्यासाठी धडपड केली. आता शेतकऱ्यांची मदार रब्बी हंगामावर आहे. हरभरा आणि गहू पेरणीचे क्षेत्र त्यामुळे यावर्षी वाढणार आहे. त्यामुळे शेतकरी रब्बी हंगामाच्या मशागतीच्या कामाला लागला आहे. शेतकरी

काही शेतकरी सर्जा राजावर तर काही ट्रॅक्टरद्वारे कल्टीवेटर, रोटावेटर,पंजी अशा प्रकारे मशागत करीत आहे. काही शेतकऱ्यांनी हरभरा पेरणीला प्रारंभ केला आहे. हरभऱ्याची पेरणी अटोपताच गव्हाच्या पेरणीला सुरुवात केली जाणार आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची शेती पडीत राहिली व ते शेतकरी रब्बी हंगामात पीक घेणार आहेत. गहू आणि चना मोठ्या प्रमाणात असला तरी हरभरा पिकाचे क्षेत्रफळ अधिक राहणार आहे. अतिवृष्टीने खरिप पीक हातचे गेले. लागवडीला आलेला खर्च देखील निघाला नाही. त्यामुळे शेतकरी रब्बी हंगामातील पिकांच्या आशेवर आहे.. शासनानेअतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत बहुतेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही. ही मदत शेतकऱ्यांना विना विलंब मिळण्यासाठी बँकानी अनुदान वाटपाच्या कामाला गती देण्याची नितांत सद्यातरी गरज आहे. अनुदानाची मदत मिळाल्यास शेतकऱ्यांना गहू, हरभऱ्याचे बियाणे व रासायनिक खते खरेदी करणे सोयीचे होणार आहे.
अशाप्रकारे शेतकऱ्यांची सध्या तरी मशागत करणे व हरभरा पेरणीसाठी धावपळ सुरू आहे.

Previous articleमोटारसायकल स्लीप होऊन पडल्याने शेतकरी युवक जागीच ठार.
Next articleअ. भा. मराठी नाट्यपरिषदेच्या नाशिक शाखेचे राज्यस्तरीय पुरस्कार रंगकर्मीना जाहीर