38 तासात 600 किलोमीटर सायकलिंग अंतर करुन पटकवला किताब
हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नंबर – 8983319070
नाशिक शहर पोलीस दलाचे उपायुक्त संजय बारकुंड यांनी सायकल वरून अवघ्या 38 तासात 600 किलोमीटरअंतर पुर्ण करुन सुपर रँन्डेनिअरचा किताब पटकावला आहे.
धुळे येथे 15 व 16 ऑक्टबरला बीआरएम सायकल स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा मध्ये लांब पल्याच्या सायकलिंगचे लक्ष दिले जाते आणि ठराविक वेळ मर्यादा ठेवून अंतर पार करणे अनिवार्य असते. त्यानुसार दोनसे, तीनसे, चारशे व सहाशे किमीच्या सायकलिंग च्या स्पर्धाचे आयोजन केले जाते. या स्पर्धा ठरवून दिलेल्या वेळ मर्यादेत पुर्ण करणे आवश्यक असून या चारही स्पर्धा एका वर्षात पुर्ण करणाऱ्या सायकलिस्टला सुपर रँन्डोनिअर किताबाने सन्मानित करण्यात येते.
या वर्षी हा किताब पोलीस उपायुक्त संजय बारकुंड यांनी एका वर्षात चारही स्पर्धा पुर्ण करुन स्वताच्या नावावर केला आहे. नाशिक सायकलिस्ट कडून आयोजित दोनशे, तीनसे, चारशे, स्पर्धा भर पावसात पुर्ण केल्या नंतर सहाशे किमीच्या स्पर्धा साठी ही त्यांही नाशिक मध्ये नोंदणी केली होती. मात्र त्यांना नाशिक येथील सहाशे किमी स्पर्धा मध्ये सहभागी होता आले नाही. त्यांनी धुळे येथील स्पर्धा मध्ये सहभाग नोंदवत 40तास वेळेची मर्यादा असताना 600 किमीचे अंतर अवघ्या 38 तासातच पुर्ण केले.
त्यांनी सुपर रँन्डोनिअरचा किताब पटकाविल्या बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.