Home Breaking News महिला सरपंचाचे पतीराजच हाकतात गावचा गाव गाडा:-अजयसिंह राजपूत

महिला सरपंचाचे पतीराजच हाकतात गावचा गाव गाडा:-अजयसिंह राजपूत

ग्रामपंचायत स्तरावर केवळ नावापुरती महिला अन् कारभार मात्र पतीराजांचा..

खामगाव:- बहुतेक ग्रामपंचायतींमध्ये आरक्षणामुळे महिलांना सरपंच होण्याचा मान मिळतो. त्यावेळी अपवादात्मक ग्रामपंचायतीमध्ये महिला पतीचा हस्तक्षेप असतो. परंतु, आज महिलाही ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळण्यास सक्षम झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असून त्या ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळण्यास सक्षम होत आहेत, ही समाधानाची बाब आहे.परंतु असे असले तरी बहुतेक ग्रामपंचायतीच्या कारभारात महिला सरपंच पतीच लुडबुड करतांनाचे चित्र तालुक्यातील ग्रामपंचायत मध्ये दिसून येत आहे.
स्थानिक राजकारणात महिला सक्रिय झाल्याचा आभास निर्माण केला जात आहे.महिलांना ५०% आरक्षण दिले असले तरी ग्रामपंचायत कारभारात त्यांचे पतीच गावगाडा हाकतांनाचे चित्र दिसून येत आहे.या लुडबुड करणारे पतीराजांना ग्रामसेवकासह अधिकारी सहकार्य करतात.महिला सरपंच फक्त नामधारी असून त्यांच्या आरक्षणाचा हेतू सफल झाला नसल्याने खंत व्यक्त केली जात आहे. अनेक गावांमध्ये मासिक बैठकीत सुध्दा महिला सदस्य उपस्थित नसतात. त्यांच्या उपस्थितीच्या सह्या घेण्यासाठी शिपायाला घरी जावे लागते. बर्याच ठिकाणी महिला फक्त नामधारक असतात.यामूळे फक्त पद मिळविण्यासाठी पत्नीचे नाव पुढे केले जात आहे.यांना ग्रामसेवक अधिकारी वर्ग साथ देवून सहकार्य करतांनाचे चित्र दिसून येत आहे.पतीराज म्हणेल तोच निर्णय घेतला जातो, महिला सरपंच फक्त सहीच्या धनी झाल्या आहेत.

Previous article*पीकविमा तक्रार आणि समज-गैरजमज एक चिंतन!
Next articleपोलीस उपायुक्त संजय बारकुंड बनले सुपर रँन्डोनिअर