Home Breaking News *पीकविमा तक्रार आणि समज-गैरजमज एक चिंतन!

*पीकविमा तक्रार आणि समज-गैरजमज एक चिंतन!

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर नांदेड जिल्हा संपादक दिनांक- 21 /10/2022

सध्या पीकविमा तक्रार दाखल करण्यासाठी शेतकरी विमा कंपणी कार्यालयात येत आहेत….
झेरॉक्स वाल्यांचा धंदा तेजीत चालण्यासाठी शेतकऱ्यांना गरज नसताना कागदपत्रे घ्यायला लावतात…
फाईलचा बंचच तयार करून शेतकऱ्यांना देतात. यामुळे शेतकरी यांचे आर्थिक नुकसान होते.

तेव्हा काही उपयोजना…..

पावसामुळे जर सोयाबीन पिकाचे नुकसान झाले असेल तर विमा कंपनीला 72 तासांच्या आत तक्रार दाखल करावयाची पद्धती आहे.

१. क्रॉप इन्शुरन्स ॲप वर ऑनलाईन तक्रार करने..हे खुप सोपं आहे. व प्ले स्टोअर वर अॅप उपलब्ध आहे..ॲप ने ऑनलाइन तक्रार केल्यानंतर त्याचा डॉकेट आयडी नंबर येत असतो , तो लिहून ठेवावा.

२. विमा कंपनीच्या टोल फ्री नंबर वर फोनवर तक्रार करावी.. तेव्हा तक्रार क्रमांक येतो.
(टोल फ्री नंबर हा विमा पावतीवर असतो) तो सतत व्यस्त असतो.
३.विमा कंपनीच्या ईमेलवर तक्रार करणे . याची सुध्दा रिप्लाय मिळतो.हा सर्वात सोपा मार्ग..
४) विमा प्रतिनिधी क्लेम करताना कोणत्या प्रकारची पैसे देवू नये..
यानंतर कृषी विभागात किंवा विमा कंपनीला कुठेही अर्ज द्यायची गरज नाही. ऑनलाइन तक्रार दाखल केल्यानंतर कागदपत्र घेऊन कार्यालयात यायची गरज नाही.. हे शेतकऱ्यांना माहिती असावी..

(ऑफलाइन अर्ज कोणी द्यावा- ज्या शेतकऱ्यांना ऑनलाइन क्लेम करता येत नाही, किंवा
टोल फ्री नंबर वर फोन नाही लागला, किंवा
ईमेलवर जर तक्रार नाही करता आली तरच
.. तरच ऑफलाईन अर्ज पाऊस पडल्याच्या 72 तासात विमा कंपनीच्या कार्यालयात द्यावा. नसता देऊ नये.) या सर्व बाबींचा विचार करता पिकविमा कंपनीला शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आर्थिक मदत देण्यासाठी काहीच हरगत नाही. परंतु तसे होतांना दिसत नाही. पिकविमा कंपनी आणि शासन निर्णय व नियम अटी समजुन घेतांना शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहतात.
यावर्षी प्रसंड अतिवृष्टी झाली. लख्ख प्रकाशाने उजळून निघणारी शेतकऱ्यांची दिवाळी मदत न मिळाल्याने अंधारातच जाते की, काय? असा बळीराजाला प्रश्न पडलेला आहे.
👉 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हिमायतनगर शाखेने वाशी हे गांव लावुन दिवाळीपूर्वी वाटप चालू केले आहे. शाखा व्यवस्थापक वाडेकर साहेब भ्रमणध्वनीवर विचारले असता, लवकरच कमी वेळात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना अनुदान आम्ही वाटप करणार आहे.
एटीएम कार्ड धारकांनी एटीएम चार वापर करून बॅकेला सहकार्य करावे. असेही ते म्हणाले.

Previous articleडॉ. मनोरमा व प्रा. हरिभाऊ शंकरराव पुंडकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बाळापूर येथे ” स्वच्छता भारत अभियान 2.0″ चे आयोजन.
Next articleमहिला सरपंचाचे पतीराजच हाकतात गावचा गाव गाडा:-अजयसिंह राजपूत