Home Breaking News अबे.. ओबीसी हो बाबासाहेबांचा फोटो लावला का घरात… मंग कधी लावता? प्रा....

अबे.. ओबीसी हो बाबासाहेबांचा फोटो लावला का घरात… मंग कधी लावता? प्रा. नितेश कराळे

कॉलेज ऑफ मॅनेजमेंट तर्फे आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी

खामगाव : “ओबीसी समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामधील कलम ३४० नुसार घटनेमध्ये न्याय व हक्काचे आरक्षण मिळवून दिले. ओबीसी समाजाने बाबासाहेबांचा फोटो स्वताच्या घरात लावला का? मग केव्हा लावता? असा प्रश्न उपस्थितांना फिनिक्स अकेडमी, वर्धा चे संचालक प्रा. नितेश कराळे यांनी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट तर्फे कोल्हटकर स्मारक मंदिर येथे आयोजित स्पर्धा परीक्षा कार्यशाळेमध्ये केले.
लक्ष्मीनारायण ग्रुपद्वारे आयोजित स्पर्ध परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेस कोल्हटकर स्मार मंदिर येथे विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला होता. यावेळी प्रा. नितेश कराळे सरांनी उपस्थितांना डॉ. बाबासाहेबांनी घटनेमध्ये एसटी-एससी समाजा सोबत ओबीसी समाजाला कलम ३४० नुसार आरक्षणाचा अधिकार घटनेमध्ये मिळवून दिला त्याबाबत ओबीसी समाजाने बाबासाहेबांचा फोटो घरामध्ये लावायला हवा असे मत यावेळी नितेश कराळे यांनी मांडले. सोबतच “प्रत्येक घरात शिवबा जन्मावा, त्याच्या हातात तलवारी ऐवजी बाबासाहेबांचा पेन असावा.” या घोषणेसह त्यांनी विद्यार्थ्यांना समाजाच्या प्रगती करिता तीन कार्यक्षेत्र निवडावे पहिले प्रशासकीय, दुसरा राजकारण व तिसरे म्हणजे न्याय पालिका. यामुळे मागासवर्गीय समाज बरोबरीने प्रगती करू शकेल असे मत सुद्धा यावेळी त्यांनी व्यक्त केले. शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे, ते पिल्यावर माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही. शिक्षणामुळे आपल्याला आपले हक्क कळतात हक्कासाठी लढण्याचे बळ शिक्षण देते. स्वतावर विश्वास ठेवा, स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असताना व्यक्ती नेहमी एकाग्र असला पाहिजे त्यामुळे यश हमखास मिळतेच. स्वताचा स्वतंत्र विचार असू द्या नाविन्याची कास धरा. जिद्द, प्रेरणा, आशा अपेक्षा यामुळेच तुम्ही विजयाचे शिलेदार व्हाल. अनेक छोट्या मोठ्या बाबी सांगतांना विविध उदाहरणांद्वारे नितेश कराळे सरांनी उपस्थितांना मौलिक मार्गदर्शन केले.

एमपीएससी-युपीएससी, पोलीस भरती तसेच इत्यादी स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी युवा पिढीला मार्गदर्शन मिळावे या उदात्त हेतू समोर ठेवून लक्ष्मीनारायण ग्रुप चे अध्यक्ष तेजेन्द्रसिंह चौहान यांनी वर्धा येथील फिनिक्स अकेडमीचे संचालक प्रा. नितेश कराळे यांचे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक लक्ष्मीनारायण संस्थेचे अध्यक्ष तेजेन्द्रसिंह चौहान, कार्यशाळेचे मार्गदर्शक प्रा. नितेश कराळे, संचालिका सौ. राजकुमारी चौहान, संस्थेचे सचिव अॅड. देवेंद्रसिंह चौहान, प्राचार्य राहुल अग्रवाल, डॉ. कालीदासजी थानवी, डॉ.गायत्री थानवी, माजी नगराध्यक्ष गणेशभाऊ माने, अॅड. अविनाश इंगळे, अॅड. मनदीपसिंग चव्हाण, जसवंतसिंह चौहान, स्वप्नील ठाकरे पाटील, संघपाल जाधव यांच्यासह ज्योतिरादित्य चौहान हे मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. राजकुमारी तेजेन्द्रसिंह चौहान यांनी केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना कार्गादर्शन करताना म्हणाले कि, “विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने पुढे सुद्धा अश्या प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन लाक्षमिनाराय ग्रुपच्या वतीने करीत राहू. असे प्रतिपादन त्यांनी केले. सोबतच उपस्थित कॉलेज ऑफ मॅनेजमेंट व इतर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे व स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे शब्द सुमानानी स्वागत तेजेन्द्रसिंह चौहान यांनी यावेळी केले.

कॉलेज ऑफ मॅनेजमेंट चे विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले माजी विद्यार्थ्यानाचा सत्कार यावेळी करण्यात आला. तसेच आयोजित कार्यक्रमामध्ये घेतलेल्या प्रश्न मंजुषा मालिकेचे विजेत्यांचे सुद्धा यावेळी सत्कार करण्यात आला. लक्ष्मीनारायण ग्रुप तर्फे आयोजित स्पर्धा परीक्षा कार्यक्रमास अभूतपूर्व अशी गर्दी कोल्हटकर स्मारक मंदिर येथे लाभली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विकास पल्हाडे यांनी केले. तसेच कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला, कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी संस्थेमध्ये कार्यरत मॉडेल स्कूल चे मुख्याध्यापक श्री. एस.पी. जाधव, प्रा.विलास बर्डे, प्रा. विनोद डाबरे, प्रा. वरुणराज आटोळे, प्रा. गौरव माने, प्रा. पुष्पा जावरे, प्रा. वैशाली पुदागे, प्रा. रेणुका महाजन, प्रा.ज्योती अग्रवाल, प्रा. शीतल राठी, प्रा. विनिता सावजी, प्रा. सुषमा मेहसरे, प्रा. प्रीती पमनानी, प्रा. स्नेहा गावंडे, प्रा. कोमल उन्हाळे, प्रा. किरण उन्हाळे, प्रा. स्वाती चंदन, प्रा. हर्षा भांडे, प्रा. वैशाली मामंतकर, प्रा. पूजा खेडकर, प्रा. कल्याणी गोंड, प्रा. मुंदडा, प्रा. पूजा पाटील, प्रा. गोरे, प्रा. श्वेता चिंचोले, प्रा. मोहता, प्रा. सी.एस. घाटे, प्रा. अतुल पाटील, प्रा. अजय चव्हाण, अजय घाटे, आकाश खंडेराव, नरेंद्र मारवाडी, सबा अंजुम, पायल ठाकूर, सोनाली तळोकार तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Previous articleसंविधानाच्या आदर्शनुसार राज्याच्या सामाजिक न्याय विभागाची वाटचाल : आयुक्त डॉ. नारनवरे यांचे प्रतिपादन
Next articleडॉ. मनोरमा व प्रा. हरिभाऊ शंकरराव पुंडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बाळापूर येथे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा