Home Breaking News संविधानाच्या आदर्शनुसार राज्याच्या सामाजिक न्याय विभागाची वाटचाल : आयुक्त डॉ. नारनवरे यांचे...

संविधानाच्या आदर्शनुसार राज्याच्या सामाजिक न्याय विभागाची वाटचाल : आयुक्त डॉ. नारनवरे यांचे प्रतिपादन

*राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या स्थापनेला 90 वर्ष पूर्ण*

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नंबर – 8983319070

राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या स्थापनेला 15 ऑक्टों बर रोजी 90 वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने राज्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन समाज कल्याण आयुक्तांच्या प्रमुख उपस्थित आयोजित कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी आधि कारी अमिशा मित्तल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्तिथ होत्या. विभागातील सर्व अधिकारी व कर्मचा -र्यानी सेवक म्हणून काम केल्यास मोठ्या प्रमाणात सामाजिक घटकांन विकासाची गंगा पोहोचू शकेल असा आशावाद आयुक्त नारनवरे यांनी व्यक्त केला. उपस्थित असलेल्या लाभार्थीना विविध योजनांचा लाभ वाटप करण्यात आला. जिल्हा जात प्रमाणपत्र समिती च्या वतीने जात वैधता प्रमाणपत्रा चेही वाटप करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा जात प्रमाणपत्र समितीअध्यक्ष गीतांजली बाविस्कर, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. भगवान वीर, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त माधव वाघ, प्राचार्य विलास देशमुख, सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे आदी उपस्तिथ होते.

Previous article*हरभरा बियाणेसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत*
Next articleअबे.. ओबीसी हो बाबासाहेबांचा फोटो लावला का घरात… मंग कधी लावता? प्रा. नितेश कराळे