मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 16 /10/2022
👉जनावरांना घेतला चावा.
पळसपुर येथील
शेतकरी हा आधीच अतिवृष्टीच्या दृष्ट चक्रात अडकलेला असतानाच, त्याच्यावर आता नवीन एक संकट पशुपालकावर उभे राहिले आहे. शेतकऱ्यांनी आपले पशुधन बाळगण्यासाठी मोठी काळजी घ्यावी लागते आहे.
गावांमध्ये जंगली कोल्ह्यांचा फार मोठ्या प्रमाणात वावर आहे. पण आता त्यातील काही कोल्हे हे पिसाळलेले आहेत. जंगलातील अनेक कोल्हे पिसाळलेल्या अवस्थेत आहेत. अक्षरशा पिसाळलेल्या कोल्ह्याने पळसपुर गावात फार मोठी दहशत पसरवीली आहे. त्यात अनेकांना या कोल्ह्यानी चावा घेतला आहे. परिणामी अनेक म्हैस, गाय, वाससरे, बैलं यांचा मुत्यू होत आहे. वनविभागाला कळवून सुध्दा वतीने पिसाळलेल्या व भटक्या कोल्हाना योग्य बंदोबस्त करण्याची आवश्यकता आहे. कारण त्या जनावरांचे मास खाल्ल्याने परिसरातील भटके कुत्रेही पिसाळलेले आहेत. असे चावलेल्या भटक्या कुत्र्यामुळे जनावरे फार मोठ्या प्रमाणात धगु शकतात. आणि माणसांना सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो. पण यासाठी कोणतीही शासकीय यंत्रणा पुढाकार घेत नाही. असे पळसपुर येथील गावकऱ्यांचे म्हणने आहे. रोज गुरे मरत चालली आहेत. यावर वन विभाग कोणतेही कारवाई करीत नाही. आणि मृत्यू पावलेल्या जनावरांच्या मालकांना कोणत्याही प्रकारचे नुकसान भरपाई सरकारकडून मिळत नाही. वनविभाग वाले सांगतात की, तुम्ही पशुवैद्यकीय डॉक्टरांचे पीएम आणून द्या. पण ते मिळत नाही. आणि कोणत्याही प्रकारची शेतकऱ्यांना भरीव मदत मिळत नाही. शेतकऱ्यांनी आपले जनावरे कशी जोपासावी हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. काल बाबुराव शिरफुले यांच्या अंदाजे साठ हजार किमतीच्या बैलांना कोल्हयाने चावा घेऊन मरण पावले आहे. या वर कोणाचेही नियंत्रण नाही तोंडी सूचना देवून कोणत्याही अधीकारी प्रतिसाद देत नाही. अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे. शेतकऱ्यांच्या पशुधनाची सुरक्षिततेची हमी शासनाने घेऊन पिसाळलेल्या कोल्हाचा वनविभागाने वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी पळसपुर येथील गावकऱ्यांची आहे.