Home Breaking News परतीच्या पावसाने सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान.

परतीच्या पावसाने सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 14 सप्टेंबर 2022

👉 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळी पुर्वी मदत द्यावी.
‌‌
हिमायतनगर : तालुक्यातील बहुतांश भागात मागील काही दिवसापासून अधुन मधुन सतत मुसळधार पाऊस पडत आहे. अतिवृष्ठीतुन शिल्लक राहीलेले सोयाबीन पिकाची काढणी असतांच, पावसामुळे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेले पिक काढणीची लगबग चालु असताना, त्यात आज दुपारी अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस पडलेला आहे. तर शेतकऱ्यांचा तोंडाशी आलेला घास पावसाने हिसकावून घेतला. त्यामुळे काढणीस आलेल्या सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले. परिणामी शेतकरी चिंतेत आहेत. यंदा पेरणीनंतर पावसाने मोठा खंड दिला. त्यामुळे पिकांची उगवण क्षमता कमी झाली. त्यातून जे पीक वाचले त्याला नंतर अतिवृष्टीचा फटका बसला. या दोन्ही संकटातून थोडेफार पीक हाती आले होते. त्यातून काही प्रमाणात लागवड खर्च निघून नुकसान कमी होईल, अशी आशा होती.
पण ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाचा पुन्हा एकदा या पिकांना मोठा फटका बसला आहे. ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून त्याची गंजी शेतात लावून ठेवली होती त्या शेतकऱ्यांची सोयाबीन पिकाला झाकताना मोठी तारांबळ उडाली. अनेकांच्या पिकात पाणी साचल्याने आता सोयाबीन काढणीस अडथळा आला आहे. परिणामी, शेतकरी चिंतेत आहेत.

शेंगांना कोंब फुटण्याची भीतीसोयाबीनच्या शेंगा वाळल्या आहेत. काहींना मजुराअभावी सोयाबीन पीक काढता आले नाही. त्यामुळे शेतातच असलेल्या या वाळलेल्या सोयाबीन शेगांना या पावसामुळे कोंब फुटू शकतात. तसे झाले तर काहीच पीक हातात येणार नाही, अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. बुधवारी दुपारी १वा हिमायतनगर शहरासह परिसरात मेघगर्जनेसह २तास ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यानंतरही काहीवेळ रिमझिम सुरूच होती.मागील चार पाच दिवसांपासून तालुक्यात कुठे ना कुठे रोज जोरदार पाऊस पडत आहे. एक दिवस पावसाने विश्रांती घेतली. तोच बुधवारी पुन्हा पाऊस झाला. शहरातील रस्त्यांवरून पाणी वाहून गेले. अचानक आलेल्या पावसामुळे काहीवेळ शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. भाजीपाला विक्रेते, पथारीवाले यांची चांगलीच तारांबळ उडाली. ग्रामीण भागात ओढ्या-नाल्यांना पूर आला होता. शेतीच्या कामांना व्यत्यय आला.

Previous articleकर्मचार-यांनीही करावी पदवीधर मतदार नोंदणी
Next article*महाराष्ट्रभर ख्यातनाम पर्यावरण मित्र पुरस्काराने सन्मानित शितल शेगोकार यांचा वाढदिवस संपन्न*