Home Breaking News कर्मचार-यांनीही करावी पदवीधर मतदार नोंदणी

कर्मचार-यांनीही करावी पदवीधर मतदार नोंदणी

नाशिक जिल्हाधिकारी डी. गंगाथरन यांचे नोंदणी शिबिरात आवाहन, 7नोव्हेंबर पर्यंत मुदत

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नंबर – 8983319070

नाशिक जिल्ह्यातील शासकिय अधिकारी, कर्मचा-यांनी पदवीधर मतदार म्हणून आपले नाव नोंदवावे व आपल्या कार्यालयीन सहका-यांच्या नोंदणीतही पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डी. गंगाथरन यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (दि.13)रोजी आयोजित महसूल अधिकारी, कर्मचारी यांच्या पदवीधर मतदार नावनोंदणी शिबिरात त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यात 1ऑक्टोंबर 2022 पासून पदवीधर नोंदणी चे काम सुरु झाले असून ते 7 नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयातील आधिकारी, कर्मचारी यांनी आपली नाव नोंदणी वेळेत पदवीधर मतदार या दीत नोंदणी करुन घ्यावी. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील आधिकारी, कर्मचा-यांचे नोंदणी फॉर्म नमुना 18 भरून घेतल्यानंतर सहाय्यक मतदार नोंदणी आधिकारी तथा जिल्हाधिका-यांना ती सुपूर्द करण्यात आली.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोई फोड़े, उपजिल्ह्या निवडणुकी आधिकारी स्वाती थविल, उपजिल्ह्याधिकारी भीमराज दराडे, नितीन मुंडावरे, ‘न्हाई ‘ चे प्रकल्प संचालक बी. एस. साळूखे, तहसीलदार पल्लवी जगताप, दीपाली गवळी, राजेंद्र नजन यांच्या सह कर्मचारी उपस्थित होते.

Previous articleखडकी फाटा येथे मोटारसायकल व कार चा भीषण अपघात
Next articleपरतीच्या पावसाने सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान.