काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान
नुकसान ग्रस्त शेतकरी संसाराचा गाडा चालवण्यासाठी चिंतातुर.शासन तात्काळ मदत करेल का या आशेवर
भुमिराजा न्यूज प्रतिनिधी
रविकुमार पवार खडकीकर
मो.7350333415
हिमायतनगर :-
तालुक्यातील बहुतांश भागात मागील आठ दिवसापासून अधुन मधुन सरी कोसळत होत्या.अतिवृष्ठीतुन शिल्लक राहीलेले सोयाबीन पिक शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेले पिक काढणीची लगबग चालु असताना.त्यात १२रोजी दुपारी अचानक ढगफुटी सदृश्य पावसाने तर शेतकऱ्यांचा तोंडाशी आलेला घास पावसाने हिसकावून घेतला. त्यामुळे काढणीस आलेल्या सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले. परिणामी, शेतकरी चिंतेत आहेत.यंदा पेरणीनंतर पावसाने मोठा खंड दिला. त्यामुळे पिकांची उगवण क्षमता कमी झाली. त्यातून जे पीक वाचले त्याला नंतर अतिवृष्टीचा फटका बसला. या दोन्ही संकटातून थोडेफार पीक हाती आले होते. त्यातून काही प्रमाणात लागवड खर्च निघून नुकसान कमी होईल, अशी आशा होती.
पण, ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाचा पुन्हा एकदा या पिकांना मोठा फटका बसला आहे. ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून त्याची गंजी शेतात लावून ठेवली होती त्या शेतकऱ्यांची सोयाबीन पिकाला झाकताना मोठी तारांबळ उडाली. अनेकांच्या पिकात पाणी साचल्याने आता सोयाबीन काढणीस अडथळा आला आहे. परिणामी, शेतकरी अतिचिंतेत आहेत.
शेंगांना कोंब फुटण्याची भीतीसोयाबीनच्या शेंगा वाळल्या आहेत. काहींना मजुराअभावी सोयाबीन पीक काढता आले नाही. त्यामुळे शेतातच असलेल्या या वाळलेल्या सोयाबीन शेगांना या पावसामुळे कोंब फुटू शकतात. तसे झाले तर काहीच पीक हातात येणार नाही, अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. दि १२ रोजी बुधवारी दुपारी १वा हिमायतनगर शहरासह परिसरात मेघगर्जनेसह विजेंच्या कडकडाटा सह २तास ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यानंतर ही गुरुवारीही पाण्याची बचत सुरूच आहे त्यानंतरही काहीवेळ रिमझिम सुरूच होती.मागील चार पाच दिवसांपासून तालुक्यात कुठे ना कुठे रोज जोरदार पाऊस पडत आहे. एक दिवस पावसाने विश्रांती घेतली. तोच बुधवारी पुन्हा पाऊस झाला. शहरातील रस्त्यांवरून पाणी वाहून गेले. अचानक आलेल्या पावसामुळे काहीवेळ शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. भाजीपाला विक्रेते, पथारीवाले यांची चांगलीच तारांबळ उडाली. ग्रामीण भागात ओढ्या-नाल्यांना पूर आला होता. शेतीच्या कामांना व्यत्यय आला आहे. उभ्या असलेल्या सोयाबीनचा रानात मुसळधार पाण्यामुळे तलावाचे स्वरूप दिसून येत आहे. या सर्व बाबींमुळे आमचे जगणे मुश्कील झाले असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.