कॉलेज ऑफ मॅनेजमेंट तर्फे आयोजन
अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी
खामगाव :- दि. १६ ऑक्टोबर रोजी ठीक सकाळी ११.०० वाजता कोल्हटकर स्मारक येथे लक्ष्मीनारायण ग्रुपचे कॉलेज ऑफ मॅनेजमेंटच्या वतीने शैक्षणिक मार्गदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने आणि निराशेच्या जगतातून चिंतामुक्त जीवन त्यांनी व्यतीत करावे यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करून जीवन सुखकर व समृद्ध करता येते असा ज्यांचा स्वताच्या जीवनाचा जीवनपट सांगतो. असे फिनिक्स अॅकॅडेमीचे संचालक, वर्धा येथील प्रा.नितेश कराळे सर यांचे प्रमुख मार्गदर्शन यावेळी होणार आहे. लक्ष्मीनारायण ग्रुपचे अध्यक्ष तेजेन्द्रसिंह चौहान तसेच संचालिका सौ.राजकुमारी तेजेन्द्रसिंह चौहान अश्या प्रकारच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन गेली पंधरा वर्षांपासून सातत्यपूर्णपणे राबवीत असतात. विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण व्हावे, नव्या आशा पल्लवित व्हाव्यात, गुणपत्रिकेतील गुणांपेक्षा गुणवत्ता महत्वाची असते. खऱ्या अर्थाने जिद्द आणि प्रयत्न समर्पण वेळेचा सदुपयोग ही आपल्यामध्ये आपले वेगळेपण निर्माण करण्याची साधन आहेत. प्रत्येक परीक्षेमध्ये यश मिळेलच असे नाही. मात्र अपयश आल्यानंतर खचून न जाता जीवनाच्या परीक्षेत पास होता येत हेच सांगण्यासाठी अस्सल वऱ्हाड मायबोलीतून मुक्तपणे मार्गदर्शन करण्यासाठीच प्रा.नितेश कराळे याचे मार्गदर्शन ऑनलाईन युट्यूबच्या माध्यमातून आपण त्यांना पाहतो/ऐकतो मात्र पहिल्यांदाच आपल्या खामगावात त्यांच्या मार्गदर्शनाचे आयोजन लक्ष्मीनारायण ग्रुपचे कॉलेज ऑफ मॅनेजमेंटच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमात येण्यासाठी पासची व्यवस्था करण्यात आली होती. ज्यांच्याकडे पास उपलब्ध आहेत त्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन कॉलेज ऑफ मॅनेजमेंटचे प्राचार्य राहुल अग्रवाल यांनी केले आहे.