Home Breaking News आ.रावल यांच्यावरील खटला सरकारने त्वरित विड्रॉल करावा अन्यथा नागपूर अधिवेशनवर प्रचंड मोठा...

आ.रावल यांच्यावरील खटला सरकारने त्वरित विड्रॉल करावा अन्यथा नागपूर अधिवेशनवर प्रचंड मोठा मोर्चा काढू:- अजय सिंह सेंगर

मुंबई येथे पत्रकार परिषद

अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी खामगाव मुंबई :- देशात जर रावण दहन केला म्हणून ॲट्रॉसिटी केस होत असेल तर हा हिंदू धर्माचा प्रचंड अपमान होय सरकारने त्वरित आमदार जयकुमार रावल यांच्यावरील ॲट्रॉसिटीचा गुन्हा विड्रॉल करावा अन्यथा नागपूर अधिवेशनवर राजपूत महामोर्चा,विश्व हिंदू परिषद,महाराष्ट्र करणी सेना, बजरंग दल, सनातन , युवा शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, हिंदू महासभा, हिंदू समाज पार्टी , महाराणा ब्रिगेड, अखिल भारतीय क्षत्रिय महासभा, क्षत्रिय जन संसद मोर्चा काढणार असल्याचे पत्रकार परिषदेमध्ये राजपूत महामोर्चा प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी प्रतिपादन केले.
ॲट्रॉसिटी ॲक्ट हा समस्त हिंदूच्या सर्व जातींना लागू करावा.
पुढे सेंगर म्हणाले की ॲट्रॉसिटी ॲक्ट हा समस्त हिंदूच्या सर्व जातींना लागू करावा, फक्त एससी एसटी करिता लागू करणे हे संविधानाच्या समानता तत्व विरोधात आहे.
आ.जयकुमार रावल यांच्यावर मी ॲट्रॉसिटी ॲक्ट ची खोटी तक्रार दाखल केली त्याची सखोल चौकशी करण्यात यावी आणि खोटी तक्रार करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा असे ते म्हणाले.
आमदार जयकुमार रावल हे राजपूत समाजाचे बलाढ्य लोकप्रिय असे राजपूत नेते म्हणून ओळखल्या जातात.
हिंदू राजा महापराक्रमी बप्पा रावल यांचे ते वंशज आहे.
हिंदू धर्माच्या सणाविरुद्ध काही अप प्रवृत्ती हिंदू धर्माला बदनाम करण्याचे कट आणि कारस्थान रचित आहे, हिंदू धर्मात रावण दहन करण्याची हजारो वर्षापासून प्रथा आणि परंपरा आहे , रावण दहन म्हणजे अनिष्ट प्रवृत्ती चा नाश करणे हा या मागील उद्देश आहे. रावण हा ब्राह्मण व अति विद्वान होता ,
“रावण दहन विरुद्ध कधी ब्राह्मण समाजाने विरोध केला नाही. मग काही जातींनी विरोध करणे योग्य नाही.”
स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हेमंत देशमुख यांनी स्थानिक आदिवासी लोकांना हाती घेऊन रावण दहन कार्यक्रमाला विरोध केला. राज्यामध्ये बीजेपीचे राज्य आहे म्हणून बीजेपीच्या एका आमदारांना बदनाम करण्याचे कट आणि कारस्थान सुरू आहे, रावण दहन केल्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल झाली म्हणून हिंदू समाजामध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण दिसून येत आहे. याबाबत महाराष्ट्र करणी सेनाप्रमुख अजय सिंह सेंगर दिनांक 10 ऑक्टोंबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची सागर या त्यांच्या बंगल्यावर भेट घेऊन आमदार जयकुमार रावल यांच्यावरील खटला विड्रॉल करण्याचे निवेदन दिले यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील तसेच अन्य हिंदू संघटनेचे नेते उपस्थित होते.
या पत्रकार परिषदेला श्री करणे सेना महिला इकाई अध्यक्ष सौ अमिता चोहान, सेवालाल सेना चे शंकर आडे , व सामाजिक कार्यकर्ते रमेश सकट उपस्थित होते सदरची पत्रकार परिषद मुंबई येथील मराठी पत्रकार संघ येथे संपन्न झाली

Previous articleदिवाळी पुर्वी शेतकऱ्यांना अनुदान वाटप करावे- सरपंच संघटनेचे अध्यक्ष परमेश्वर गोपतवाड…
Next articleखदखद फेम प्रा. नितेश कराळे १६ ऑक्टोबर रविवार ला खांमगावात..!