Home Breaking News दिवाळी पुर्वी शेतकऱ्यांना अनुदान वाटप करावे- सरपंच संघटनेचे अध्यक्ष परमेश्वर गोपतवाड…

दिवाळी पुर्वी शेतकऱ्यांना अनुदान वाटप करावे- सरपंच संघटनेचे अध्यक्ष परमेश्वर गोपतवाड…

अंगद सुरोशे
हिमायतनगर प्रतिनिधी/ शासनाने अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची प्रचंड हानी झाल्याची दखल घेऊन नोसर्गीक आपतीत अडकलेल्या शेतकऱ्यांना तालुक्यासाठी ४२ कोटी ७४ लाख ७ हजार दोनशे अनुदान दिले आहे.शेतक-यासाठी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांचाही पाठपुरावा वाखाणण्याजोगे असल्याचे कोणालाही नाकारता येणार नाही.तालुक्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँके एकमेव असुन बॅकेकडुन युध्दपातळीवर प्रयत्न करुन शेतकऱ्यांना दिवाळी पुर्वी अनुदान वाटप सुरू केले तर पाच महिन्यांचा कालावधी लागणार आहे. तात्काळ अनुदान मिळण्यासाठी बॅकेच्या वेळेपुर्वी आणि सुटिच्या दिवशी बॅक चालू ठेवुन ए.टि.एम.कार्डाचे वाटप केलें तर शेतकऱ्यांना वेळेवर अनुदानाची रक्कम मिळण्यास मदत होणार असुन दलालांच्या जाळ्यात शेतकरी भरडल्या जाणार नाही. याकडे बॅकेचे चेअरमन वसंतराव चव्हाण, ऊपचेअरमन हरिहरराव भोसीकर,बॅकेचे कार्यकारी संचालक कदम, सरव्यवस्थापक मारोतराव पाटील शिंदे यांनी लक्ष द्यावे अशी मागणी सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष परमेश्वर गोपतवाड यांनी केली आहे.
या संबंधी अध्यक्ष परमेश्वर गोपतवाड यांनी असे म्हटले आहे की, बॅकेकडुन दररोजच्या कामकाजासाठीच्या ग्राहकांची संख्या तशी कमीच आहे.शेतकरी उसाचे बिल आणि शासनाकडून मिळालेल्या अनुदानासाठी बॅकेत मोठ्या प्रमाणावर येतात.अनुदान वाटप काळात सकाळी आठ वाजेपासून रांगाच रांगा लागतात.काही दलाल ही आपले हात धुवून घेतात.मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणा-याची संख्या देखील अनुदान वाटपाच्या काळात पावसाळ्यातील छत्र्या सारखे बॅकेजवळ उगवतात.शेतकरी देखील आपला पुर्ण दिवस बॅकेत गेला तर गाय,वासर,बैलासाठी चारा पाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून दलालांच्या जाळ्यात अडकतात.बॅकेच्या पदाधिकारी आणि अधिकारी वर्गाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांची लुट होऊ नये म्हणून बॅकेच्या सुटिच्या दिवशी ए.टि.एम.कार्ड वाटपाचे काम हाती घेतले तर बॅकेत गर्दी होणार नाही.शेतक-याची लुटही होणार नाही.बॅकेत कर्मचाऱ्यांची संख्या कमीच असुन अशा अवस्थेत नैसर्गिक आपतीतुन सावरण्यासाठी शेतकऱ्यांना शासनाने दिलेले अनुदान वेळेवर मिळण्यासाठी नियोजन करणे काळाची गरज आहे.तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या आष्टि शाखेच्या जवळ असलेल्या ७ गावे तर तामसा शाखेकडून १ गावच्या शेतकऱ्यांचे अनुदान वाटप करण्याची व्यवस्था आहे. उर्वरित ५९ गावच्या शेतकऱ्यांचे अनुदान हिमायतनगर शाखेकडून होत असते.सर्व गावांना अनुदान वाटप करण्यासाठी जवळपास पाच महिन्यांचा कालावधी लागणार आहे.युध्द पातळीवर वाटपासाठी ए टि एम हाच पर्याय असुन ज्या शेतकरी सभासदांना ए टि एम नाही त्यांना तात्काळ द्यावे अशी मागणी सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष परमेश्वर गोपतवाड यांनी केली आहे.

धनादेश बॅकेला देऊन आठवडा उलटला,
आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते उपविभागीय दंडाधिकारी ब्रिजेश पाटील तहसीलदार, जीवराज डापकर दत्तात्रय गायकवाड गटविकास अधिकारी मयुरकुमार आदेलवाड यांच्या उपस्थितीत अनुदानाचा धनादेश देऊन आठवडा उलटला तरी १२ आक्टोबर पर्यंत प्रत्यक्षात वाटप सुरूच झाले नाही.शेतक-याना आपली बॅक वाटत असताना कामाच्या मंदगतीकडे वरीष्ठ दुर्लक्ष करीत असल्यामुळे वाटपाचा शुभारंभ झाला नसल्याचे गोपतवाड यांनी म्हटले आहे.

Previous articleपत्रकारांना धमकी देणाऱ्यास होणार दंड ५०,०००/-, ३ वर्षांपर्यंत तुरुंगवासही होऊ शकतो.
Next articleआ.रावल यांच्यावरील खटला सरकारने त्वरित विड्रॉल करावा अन्यथा नागपूर अधिवेशनवर प्रचंड मोठा मोर्चा काढू:- अजय सिंह सेंगर