मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 09 /10/ 2022
नांदेड :-जिल्ह्यासह राज्यभरात आज दि.९/१०/२०२२ रोजी रविवार महर्षी वाल्मिकी यांची जयंती नांदेड पशुसंवर्धन उपायुक्त व पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयात डॉ.सखाराम खुणे व डॉ.प्रवीणकुमार घुले यांच्या हस्ते, महर्षी वाल्मिकी ऋषींच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पुजन व महर्षि वाल्मिकी यांच्या जीवनावर विचार मांडण्यात आले.
महर्षी वाल्मिकी यांचा रत्नाकर (वाल्या) ते महर्षी वाल्मिकी पर्यंतचा जीवन प्रवास, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये प्रतिकूल परिस्थितीत घडवून आणलेले, आमुलाग्र सकारात्मक परिवर्तन, तसेच त्यांचे जीवनकार्य आम्हा सर्वांसाठी अतिशय आदर्श व प्रेरणादायक आहे.
हजारो वर्षापूर्वी ज्या काळात समाज निरक्षरता, अज्ञानतेच्या अंधारात चाचपडत होता. त्या काळात त्यांनी शिक्षणाचे, लेखनीचे महत्व ओळखुन अंधकारमय, हिंसात्मक मार्गाचा, वाईट कर्माचा, अज्ञानाचा त्याग करुण आपल्या जीवनात आम्रुलाग्र परिवर्तन घडवून आणून प्रकाशाचा, अहिंसेचा ज्ञान मार्गाचा स्वीकार करुण, कठोर तप, अविरत कष्टाने ज्ञान प्राप्त केले. संस्कृत भाषेमध्ये जवळपास चोवीस हजार श्लोकांची रचना करुण ” वाल्मिकी रामायण” या जगातील सर्वात प्रथम महाकाव्याची निर्मिती केली आणि ज्ञानाची कवाडे सर्वसामान्य लोकांसाठी खुली करून महर्षी पद प्राप्त केले. प्रथम महाकाव्याची रचना केल्याने आद्यकवी म्हणून ते समस्त मानव समाजाला पुज्यनिय, आदर्श ठरले आहेत. तसेच त्यांची चांगले शिक्षक, उत्कृष्ठ मार्गदर्शक म्हणून संपूर्ण जगभर ख्याती आहे.
व्यक्तीच्या मनात दृढ़ विश्वास, दृढ़ इच्छाशक्ति असेल, तर त्याला कोणतेही ध्येय ते कितीही कठिन का असेना निश्चितपने साध्य करता येते. हीच शिकवण आम्हाला महर्षी वाल्मिकी यांच्या विचारातून, जीवन प्रवासातुन मिळते.
महर्षी वाल्मीकी यांचे जीवन तसेच त्यांचे विचार आम्हाला वाईट कर्माचा, मार्गाचा, निरक्षरता, याबाबींचा त्याग करून, साक्षरता, परिश्रम याबाबींचा स्वीकार करून सन्मार्ग, सत्कर्माचा मार्गावर चालण्यासाठी, समाज उपयोगी कार्य करण्यासाठी सदैव प्रेरीत करते. कार्यक्रमास पशुधन विकास अधिकारी डॉ.अविनाश बुनावार,डॉ. विजय कातकाडे,डॉ.दीप्ती चव्हाण,संदीप नरेवाड,शेख सलीम,एस डी देशमुख,पि. के.पांडे, दिलीप गोरे, नितीन दुधाटे, संतोष घुले व कार्यालयातील कर्मचारी वर्ग व पशुपालक उपस्थित होते.