मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 09 सप्टेंबर 2022
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत समृद्धी लेबर बजेट तयार करण्यासाठी, तालुक्यातील सर्व ग्राम रोजगार सेवकांचे तीन दिवसीय कार्यशाळाचे आयोजन
पंचायत समिती हिमायतनगर येथे करण्यात आले. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत समृद्धी लेबर बजेट तयार करण्यासाठी तीन दिवशीचे कार्यशाळेचे आयोजन माननीय गटविकास अधिकारी मयूर आंदेलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 7 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर या कालावधीत करण्यात आले. पहिले दिवशी पंचायत समिती हिमायतनगर येथे विविध स्लाईड शो दाखवून सर्व रोजगार सेवकास मार्गदर्शन करण्यात आले. व दुसऱ्या दिवशी जवळगाव येथे शिवार फेरी व गाव फेरी घेण्यात आली. व मार्गदर्शन करण्यात आले.
“मी समृद्ध तर गाव समृद्ध “व “गाव समृद्ध तर महाराष्ट्र समृद्ध”
याप्रमाणे गावातील सर्व कुटुंबाचे सर्वेक्षण करून, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभांच्या योजना घेण्याबाबत सर्वेक्षण करण्यात येऊन, प्रत्येक ग्रामपंचायतचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. समृद्धी बजेट अंतर्गत पुढील दहा वर्षाचे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाचे नियोजन करण्यात येणार आहे. अशी माहिती मास्टर ट्रेनर श्री येवले व सहाय्यक कार्यक्रमाधिकारी श्री सूर्यवंशी ता हिमायतनगर यांनी दिली.
मौजे जवळगाव येथे शिवार फेरी ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत चे सर्व सदस्य, पत्रकार श्री गणपत नाचारे, तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतचे रोजगार सेवक ग्रामसेवक एस एम वडजकर, पॅनल तांत्रिक अधिकारी व महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ऑपरेटर उपस्थित होते.