Home Breaking News हिमायतनगर तालुक्यातील 0 ते 20 पटसंख्या असलेल्या 18 जिल्हा परिषद शाळा होणार...

हिमायतनगर तालुक्यातील 0 ते 20 पटसंख्या असलेल्या 18 जिल्हा परिषद शाळा होणार बंद !

👉🏻आगामी काळात शासना विरोधात विद्यार्थी/पालकांना घेऊन विशाल राठोड तीव्र आंदोलन करणार .

वाडी तांड्यावरील 18 जिल्हा परिषद शाळा होणार बंद, गोरगरिब मुलांचे भवितव्य अंधारात.!

अंगद सुरोशे
हिमायतनगर ता. प्रतिनिधी /- तालुक्यातील 18 जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पटसंख्या 0 ते 20 असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा शासनाने कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे हिमायतनगर तालुक्यातील 18 वाडी तांड्यावरील दुर्गम भागातील शाळा कायमस्वरूपी बंद होणार असून शासनाचा असा निर्णय गोरगरीब कष्टकऱ्यांच्या मुलांच्या जिव्हारी येत असून त्यामुळे गोरगरिबांच्या मुला मुलींचे शैक्षणिक भवितव्य आता अंधारमय होणार असल्याच्या भावना ग्रामीण भागातील पालक वर्गातून व्यक्त होत आहेत त्यामुळे शासनाने घेतलेला हा निर्णय ग्रामीण भागातील वाडी तांड्यावरील दुर्गम भागातील शाळकरी लहान मुलांवर अन्यायकारक असल्याने पालक वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जाईल असे वडगाव ज चे सरपंच तथा सरपंच संघटनेचे तालुका सचिव विशाल राठोड यांनी सांगितले…

या बाबत सविस्तर वृत्त असे की शासनाने गेल्या दहा वर्षापासून पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण सक्तीचे व मोफत करण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा शिक्षणाच्या सर्वत्रीकरणात वस्ती तिथे शाळा असे धोरण शासनाने अवलंबविले होते त्यानुसार वस्ती तांडे दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात शाळा सुरू करण्यात आल्या होत्या त्यामुळे निश्चितच शाळाबाह्य विद्यार्थी प्रमाण कमी झाले आहे कमी विद्यार्थी संख्या असणाऱ्या शाळांचे प्रमाण कमी झाले कमी विद्यार्थी संख्या असणाऱ्या शाळांचे प्रमाण अतिशय दुर्गम तसेच वाडी ,वस्ती तांडे व आदिवासी बहुल क्षेत्रात मोठे आहे जर का शासनाने झिरो ते वीस पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला तर या मुलांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होईल व खाजगी इंग्रजी शाळांना खतपाणी घालण्याचे काम शासनाकडून केले जात असल्याचा तीव्र संताप ग्रामीण भागातील पालक वर्गातून व्यक्त केला जात आहे

म्हणून गोरगरिबांच्या मुलांची खरी शाळा ही जिल्हा परिषदेची शाळा आहे या शाळेतून शिक्षणाचे धडे गरिबांची मुले घेत आपले भविष्य घडविण्याची धडपड करीत असतात असे असताना शासनाने ह्या शाळेची 0 ते 20 पटसंख्या कमी असल्याचे कारण पुढे करून ग्रामीण भागातील वाडी तांड्यातील व आदिवासी भागातील 18 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद करण्याचा निर्णय घेतला या निर्णयामुळे गरिबांच्या मुलांचा शिक्षणाचा हक्क हिसकावून घेतला जात आहे या निर्णयामुळे हिमायतनगर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवी अबादी वडगाव ज, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव तांडा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पावनमारी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाईन तांडा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बळीराम तांडा ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हदगाव रोड, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवी आबादी करंजी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोतलवाडी तांडा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किरमगाव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडाचीवाडी ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनव्याची वाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उखळवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडाची वाडी,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशवाडी तांडा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जीरोना, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरगडी तांडा एक, व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंदेगाव वेस्ट या तालुक्यातील 18 जिल्हा परिषद शाळा शासनाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे वाडी तांड्यावरील गोरगरीब मजुरांच्या मुला मुलींच्या भविष्यावर अंधार पडायला सुरुवात झाली आहे असा प्रश्न ग्रामीण भागातील पालकातून उपस्थित होत आहे त्यामुळे जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने तात्काळ रद्द करावा अन्यथा वाडी तांड्यावरील विद्यार्थ्यासोबत असंख्य पालकांना घेऊन शासनाच्या विरोधात वडगाव ज चे सरपंच तथा सरपंच संघटनेचे तालुका सचिव विशाल राठोड हे तीव्र आंदोलन करतील असे त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले

Previous article~~*परिवर्तन मंचाची स्थापना*~~
Next articleडॉ. सौ. शारदा नितिश अग्रवाल यांची स्त्रीरोग विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी सेवे करिता नियुक्ती